Land Update : जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात रामसिंग नावाचा एक शेतकरी राहत होता आणि त्याच्याकडे रामसिंगकडे एक एकर शेती होती. शेतीच्या उत्पन्नावर रामसिंग आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र शेती फारशी पिकाऊ नसल्यामुळे रामसिंगची परिस्थिती थोडी नाजूक होती.
१९५० मध्ये अचानक रामसिंगच्या गावातील घराला आग लागली व त्या आगीमध्ये रामसिंगचे घर जळून खाक झाले होते. रामसिंगला काय करावे, ते सूचत नव्हते आणि शेवटी रामसिंग स्वतःची शेती सोडून पोट भरण्यासाठी मुंबईत राहायला आला होता. मुंबईमध्ये मिळेल ते काम करून रामसिंग त्याचा संसार करू लागला होता. संसाराच्या आर्थिक अडचणीमुळे रामसिंग कित्येक वर्षे त्याच्या गावाकडे फिरकलाच नाही आणि रामसिंगचे काही वर्षांनंतर १९९१ मध्ये वृद्धापकाळाने मुंबईतच निधन झाले. २००५ नंतर त्याच्या मुलाला आपल्या गावच्या एक एकर जमिनीची आठवण झाली होती.
हे हि वाचा :जमीन रेकॉर्डमधील चुकीची दुरुस्ती
रामसिंगचा मुलगा त्याच्या गावात गेला असता गावातील काही लोकांनी त्याला सांगितले, की तू ती जमीन आता विसरून जा परंतु रामसिंगच्या मुलाने हार मानली नाही. रामसिंगच्या मुलाने पुन्हा पुन्हा गावात जाऊन थोडी प्राथमिक माहिती घेऊन व तालुक्याच्या रेकॉर्ड वरून जमिनीचा शोध घेतला असता रामसिंगच्या मुलाने १९३० पासूनचे सर्व उतारे शोधले होते.
त्यात त्याला त्याच्या वडिलांच्या जमिनीचा शोध लागला आणि रामसिंगच्या मुलाला फार आनंद झाला. रामसिंगचा मुलगा जेव्हा त्याची जमीन बघायला गेला तेव्हा त्याला असे आढळून आले, की शेजारचा एक शेतकरी ती जमीन कसत होता.(Land Update)
रामसिंगच्या मुलाने भावकीला आणि मोठ्या माणसांना मध्ये घालून चर्चा घडवून आणली आणि जमीन फारशी पिकाऊ नसल्यामुळे थोड्याच दिवसांत रामसिंगच्या मुलाला त्याच्या वडिलांची जमीन परत मिळाली. गावांच्या नावावरून जमिनीचा शोध घेणे आता शक्य आहे आणि त्यासाठी तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये बसून जमिनीचे पूर्वीचे रेकॉर्ड शोधता येत आहे.(Land Update)
1 thought on “Land Update : जमिनीचा शोध तहसिल कार्यालयातून कसा घ्यावा?”