Landless farm labourers : भूमिहीन शेतमजुरांसाठी मिळणार दरमहिना ३००० रुपये पेन्शन, कुठे कराल अर्ज ? - डिजिटल शेतकरी

Landless farm labourers : भूमिहीन शेतमजुरांसाठी मिळणार दरमहिना ३००० रुपये पेन्शन, कुठे कराल अर्ज ?

Landless farm labourers:असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात संरक्षण देण्यासाठी, भारत सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना (PM-SYM) ही निवृत्ती वेतन योजना सुरु केली असून त्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहिना ३०००/- रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे…

अट काय आहे?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाअंतर्गत मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणारे याचा लाभ घेऊ शकत आहात. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत आहेत. ज्यांनी ही पेन्शन योजना घेतली आहे, त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे, 60 वय झाल्यानंतर वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल तसेच  पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास 50 टक्के रक्कम जोडीदाराला मिळणार देखील आहे.

प्रीमियम किती भरावा लागेल?

या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रीमियम देले आहे. दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागणार आहे. तुम्ही जितकी रक्कम या योजनेत गुंतवाल तितकीच रक्कम केंद्र सरकारकडून त्यामध्ये भरली जाणार आहे. समजा… जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा 55 रुपये द्यावे लागतील आणि 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. इतकीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाणार आहे.Landless farm labourers

येथे करा अर्ज maandhan.in

नोंदणी कशी करावी ? –

या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या maandhan.in वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागनार आहे. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येत येइल. तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिणार आहे. यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागणार आहे. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल आणि LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC), EPFO किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकत आहे. काही राज्यांमध्ये कामगार विभाग स्वतः नोंदणी मोहीम राबवत असतात आहेत.Landless farm labourers

हे हि वाचा : मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Landless farm labourers : भूमिहीन शेतमजुरांसाठी मिळणार दरमहिना ३००० रुपये पेन्शन, कुठे कराल अर्ज ?”

Leave a Comment