land record : शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर - डिजिटल शेतकरी

land record : शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर

land record: शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं फार आवश्यक असते.

आता सरकारनं (land record) सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात देखील केली आहे.

आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा(land record) कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागणार आहे.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे.
  3. आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती आपण  पाहूया.
  4. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल आणि या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडावा लागणार आहे तसेच शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
  5. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करावे लागणार आहे.
  6. त्यानंतर तुमची शेतजमीन (land record)ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होणार आहे
  7. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकत आहात.
  8. त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता ययेणार आहे.
  9. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जावे लागणार आहे.

नकाशा

  1. आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते आपण पाहूया
  2. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला असतो
  3. इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होणार आहे.
  4. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर(land record) क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकत आहात
  5. आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
  6. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली आहे.
  7. ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय आहे.
  8. यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो आणि त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड हि  करू शकत आहात.
  9. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 33५  या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसत असतील.
  10. आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

ई-नकाशा प्रकल्प काय?

  • भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात आणि  या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे हे नकाशे फार महत्त्वाचे असतात.
  • पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत दिसत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला गेला आहे.
  • या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन बर्याच प्रमाणात करण्यात येत आहे.
  • त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येत आहे.

हे हि वाचा :मिनी ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज सुरू.. मिळणार 1 लाख 25 हजार रुपये अनुदान

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा.

20 thoughts on “land record : शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर”

Leave a Comment