पुणेः यंदा उत्पादनात (Onion Production) वाढ झाल्याने लसूण आणि कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) अडचणीत आल्याचं सांगितलं जातं आहे.
सध्या वाढलेलं उत्पादन, पण मागणीत घट, उत्पादन खर्चात वाढ, (Onion Production Cost) निर्यातीला (Onion Export) बसलेला चाप आणि सातत्याने पडणार पाऊस अशा सगळ्या गोष्टींमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली गेली आहे. सध्या टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढले आहेत मात्र सर्वत्र पाऊस सुरू असल्याने टोमॅटोच्या पिकांचं नुकसान (Tomato Crop Damage) होण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसूण व्यापारी असलेले प्रवीण कुमार धमिजा सांगतात की, घाऊक बाजारात मागच्या दोन महिन्यांपासून लसणाचा प्रतिकिलोचा दर १० ते १० रुपये होता मात्र हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचाच आहे. कारण उत्पादनाचा खर्च, तो माल बाजारात पोहोचवेपर्यंतचा खर्च असं सगळं गणित बघता शेतकऱ्यांना ते खिशाला जेपत नही.
हे हि वाचा : शेती जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसा पाहायचा? फक्त गट नबर टाका आणि आपला नकाशा मोफत पहा
मध्यप्रदेशातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे आणि लसूण उत्पादनात मध्य प्रदेश आघाीडवर आहे. पण शेतकऱ्यांना बाजारातून निव्वळ उत्पादन खर्च मिळवणंही मुश्किल झालं आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यातील बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्या असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
तसं बघायला गेलं तर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला कांदा लसणाचे दर वाढलेले दिसत असतात कारण बाजारात नवं पीक आलेलं नसतं. मात्र जिथं सर्वात जास्त कांदा पिकतो अशा महाराष्ट्र राज्यातही जुना कांदा 9 ते 13 रुपये दराने विकला जात आहे. यावर मुंबईस्थित कांदा निर्यातदार अजित शहा सांगतात की, पाच महिने साठवलेल्या या कांद्याची किंमत शेतकर्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते भरून काढणं फार गरजेचं आहे.
शहा पुढं सांगतात की, रब्बीच्या हंगामातील कांद्याचा साठा करून ठेवलेला असतो आणि पण सध्या श्रीलंकेत आणि बांगलादेशात सुरू असलेल्या समस्यांमुळे निर्यात घटलीय, तर देशांतर्गत बाजारपेठेतही मागणी घटलीय, तसेच हुबळी पट्ट्यात कांद्याच्या पिकांचं नुकसानही झालेलं नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कांद्याचे भाव कमी आहेत.
पावसाळ्यात, महाराष्ट्र राज्यातून देशभरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पुरवला जात असतो. पिंपळगाव बसवंत एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची विक्री केली जात असते. मात्र टोमॅटोचे दर 10 ते 12 रुपये प्रति किलो प्रमाणे आहेत. आत्ता आवक कमी असल्यामुळे आठवडाभरात दर वाढले आहेत, असं नाशिकचे शेतकरी अरुण मोरे सांगत आहे.