Modi Awas Yojana’ for OBCs: इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) येत्या तीन वर्षांत १२ हजार कोटी रुपये खर्चून मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला आहे. लिंगायत, गुरव, वडार आणि रामोशी समाजासाठी स्वतंत्र चार महामंडळे स्थापन करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.(Modi Awas Yojana’ for OBCs)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी घरकूल योजना व लहान समाजघटकांसाठी महामंडळांची घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी त्यानुसार अहवाल सादर केला आहे. योगायोग म्हणजे आता ओबीसी व गृहनिर्माण ही दोन्ही खाती सावे यांच्याकडेच असल्याने योजनेला गती मिळत आहे.
ओबीसी महामंडळांतर्गत दोन उपकंपन्या : महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ – वीरशैव लिंगायत समाजासाठी आणि संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ – गुरव समाजासाठी.

किती घरे? कसा मिळेल लाभ?
मोदी आवास योजनेंतर्गत २०२६ पर्यंत ओबीसींसाठी १० लाख घरे बांधण्यात येतील तसेच स्वत:चे किंवा कुटुंबाचे मालकीचे राज्यात पक्के घर नसणाऱ्यांना आणि महाराष्ट्रात किमान १५ वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. पात्र व्यक्तीस १ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.(Modi Awas Yojana’ for OBCs)
वसंतराव नाईक महामंडळांतर्गत दोन उपकंपन्या : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ – रामोशी समाजासाठी. पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – वडार समाजाच्या कल्याणासाठी आहे.
अशी राबविणार योजना(Modi Awas Yojana)
वर्ष घरकुले इतका खर्च करणार
२०२३-२४ ३ लाख ३६०० कोटी रुपये
२०२४-२५ ३ लाख ३६०० कोटी रुपये
२०२५-२६ ४ लाख ४८०० कोटी रुपये
एकूण १० लाख १२००० कोटी रुपये
हे हि वाचा : तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्या योजना सुरू आहे असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन