mosquitoes: मलेरिया, डेंग्यू असे अनेक आजार डासांमुळे पसरत असतात. त्यामुळे रोगराई पसरते आणि कधी कधी तर डास एवढे वाढतात की मग त्यांचा काय बंदोबस्त करावा, ते कळत नाही.डासांना पळवून लावण्यासाठी आपण घरात डासांची अगरबत्ती किंवा लिक्विडचा वापर करतो तसेच पण शेवटी ते ही एकप्रकारचे केमिकल्सच असतात.mosquitoes
म्हणूनच आता डासांना पळवून लावण्यासाठी हा एक अगदी नॅचरल उपाय करून पाहा आणि काही झाडं डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त मानली जात असतात. ती झाडं तुमच्या घराच्या आसपास लावली तर डास तुमच्या घराजवळ किंवा घरात फिरकणारही नाहीत.. आता ही झाडं नेमकी कोणती ते बघुया आपण…
रोझमेरीचं रोप डासांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतं असते. तुमच्या घराजवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा मग ऑनलाईन गार्डनिंग शॉपिंग साईटवर हे रोप मिळू शकत आहे.
पुदिन्याच्या वासानेही डास पळून जात असतात. शिवाय पुदिना तुम्हाला खाण्यासाठीही वापरता येतो आणि त्यामुळे घराभोवती पुदिन्याच्या ३- ४ कुंड्या ठेवून द्या. पुदिन्याच्या झाडाची विशेष काळजी घेण्याचीही फार गरज नसते.
तुळशीच्या आजुबाजुला कधीही डास फिरकताना दिसत नाहीत कारण तुळशीचा सुवास डासांना दूर ठेवत असतो. त्यामुळे घराभोवती ठिकठिकाणी तुळस लावून ठेवावे.
झेंडुच्या झाडातून येणारा सुवासही डासांना दूर ठेवतो आणि असं म्हणतात की झेंडूची झाडं असतीत तर सापदेखील आजुबाजुला फिरकत नसतत. शिवाय झेंडुची झाडं घराभोवती असतील तर त्या लाल- केशरी फुलांमुळे घराची शोभाही आणखी वाढेल.
लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाचा उपयोग देखील डासांना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो आणि शिवाय आरोग्यासाठीही गवती चहा उपयुक्तच आहे.
Lemon balm देखील डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे. Lemon balm ही पुदिन्यासारखी दिसणारी बारमाही येणारी एक औषधी वनस्पती असते.mosquitoes
उपयुक्त अशी माहिती!🙏