mouse: उंदीर वर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन 2023 - डिजिटल शेतकरी

mouse: उंदीर वर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन 2023

शेतीला सर्वात मोठा उपद्रव उंदीर(mouse)आणि उंदीरवर्गीय प्राण्यांपासून म्हणजेच रोडंट्सपासून होत असतो – विशेषतः पावसाळ्यानंतर जास्त उंदीर लागतात.

उंदीर वर्गीय(mouse)प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतक-यांनी आतापर्यंत करून पाहिलेले उपाय खालील प्रमाणे

शेतकरी बहुधा उंदीर(mouse)मारण्याचे औषध आणि थोडे पीठ एका प्लास्टिकच्या आवरणात एकत्र मिसळून झाडांच्या शेंड्यांवर ठेवत असतात आणि  ते खाऊन उंदीर मरतात व खाली पडत असतात. परंतु पावसाळ्यात ह्या विषप्रयोगाचा काहीही उपयोग होत नसतो.

शेतकरी भाजलेले दाण्यांचे कूट, तीळ, धने आणि उंदीर मारण्याचे औषध एकत्र करून झाडांच्या शेंड्यांवर ठेवत असतात. परंतु ही पद्धत उंदरांप्रमाणेच पक्ष्यांचाही बळी घेऊ लागल्याने ती घातक ठरू लागली आहे.

शेतकरी व्यावसायिक उंदीरमा-यांना बोलावतात परंतु असे लोक एक उंदीर पकडण्यासाठी २५ ते ३० रूपये घेत असल्याने ही पद्धतही परवडत नसते.

नवीन पिंज-याविषयी थोडेसे

ह्या पिंज-याची तार (बाइंडिंग वायर) बांबूच्या एका जुन्या टोपलीच्या चारही टोकांना बांधलेली असते आणि तिचे दुसरे टोक एका प्लास्टिकच्या धाग्याला बांधलेले असते आणि प्लास्टिकचा हा दोरा नारळाच्या एका झावळीला जोडलेला असतो. ही झावळी वरखाली करता येत असते. बांबूच्या ह्या टोपलीत एक मिटणारा पिंजरा ठेवून त्याला खोब-याचा एक तुकडा जोडत असतात.

उंदीर(mouse)खोब-याचा हा तुकडा खायला येतात आणि पिंज-यात सापडून मरत असतात. मेलेले उंदीर बाहेर काढून जमिनीत पुरले जात असतात आणि  ह्या रीतीने ३-४ उंदीर मारता येतात. अर्थात हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे कारण मेलेल्या उंदरांच्या शरीरातून काही विशिष्ट गंध (फेरोमॉन) सोडले जातात ज्यामुळे इतर उंदरांना सावधानतेचा इशारा मिळून ते तिकडे फिरकत नसतात..

ह्या बनवलेल्या पिंज-याची किंमत सुमारे.३०-३५ रूपये आहे.

हे हि वाचा : काणी रोग कसा नियंत्रण कराल

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “mouse: उंदीर वर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन 2023”

Leave a Comment