महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक स्कॉर्पिओ नवीन पद्धतीने सादर करत आहे. नवीन स्कॉर्पिओ (New Scorpio-N) या महिन्यात बाजारात येत आहे. कंपनीचा दावा आहे की, ही SUV बाजारात इतर सर्व वाहनांना १००% मागे टाकेल. त्यामुळे कंपनी कारला Big Daddy of SUVs म्हणून नव्या रुपात प्रमोट करत आहे.
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये एलईडी हेडलॅम्प, सी-शेप एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प मिळनर आहे. त्याचा लूक खूपच स्पोर्टी आहे तर समोरच्या ग्रिलमुळे ते खूप बोल्ड दिसत आहे. नवीन स्कॉर्पिओची आतील जागाही मोठी करण्यात येत आहे. यासोबतच अनेक फ्युचरिस्टिक फीचर्सही यात भरपूर पाहायला मिळतील.
नवीन Mahindra Scorpio N मध्ये, तुम्हाला सनरूफ, ऑटोमॅटिक ORVM, छतावरील साइड रेल्स आणि शार्क अँटेना यांसारखी फीचर्स पाहायला मिळनार आहे. आणि कारच्या रिअरमध्ये ब्रेक लाइट्स दरवाजाच्या वरच्या बाजूला देण्यात आले आहेत, तर टेल लाइट्स देखील सी-शेपमध्ये आहे.
नवीन स्कॉर्पिओमधील मिडिल सीट बेंच स्टाइलची एवडे नाही आहे. कंपनी कॅप्टन सीट असलेली न्यू लुक ही SUV आणत आहे. तसेच, मागच्या सीटवर जाण्यासाठी मधली सीट फोल्ड करण्याची गरज हि भासणार नाही. नवीन स्कॉर्पिओमध्ये थर्ड लाइन सीटवर जाण्यासाठी कंपनीने वेगळी जागा देत आहे.
नवीन स्कॉर्पिओ 2.0-लीटर mStallion चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल म्हत्वाचे इंजिन असणार आहे. हे इंजिन XUV700 आणि Thar मध्ये देखील पाहायला मिळत आहे. महिंद्रा नवीन स्कॉर्पिओ 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसह मार्केट मध्ये यते येईल.
Mahindra Scorpio N चा इन्स्ट्रुमेंट कन्सोल पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच, टचस्क्रीन सिस्टम देखील मोठ्या आकाराचे असेल. 8-इंच टचस्क्रीनसह इन्फोटेनमेंट सिस्टम नवीन स्कॉर्पिओ इंटीरियरला अधिक शानदार बनवेल आहे. हे फीचर नवीन XUV700 मध्ये आधी आपण पाहिले आहे.
Mahindra Scorpio N अनेक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज असणार आहे. रिपोर्टनुसार, कारची किंमत 14 लाख ते 18 लाख रुपये (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान शकतो असू शकते. कंपनी 27 जून रोजी Mahindra Scorpio N लाँच पूर्ण भारत भर करणार आहे.