Panjabrao Dakh Havaman Andaj :पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस - डिजिटल शेतकरी

Panjabrao Dakh Havaman Andaj :पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात सध्या मंदोस चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती बनत आहे आणि  ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाले असून गारठा कमी झाला आहे. राज्यात किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. तसेच यामुळे गारठा कमी होऊन उकाडा वाढला आहे.

अशा परिस्थितीत हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव यांनी 11 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून वादळामुळे पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj

हे हि वाचा : चक्रीवादळ आज धडकणार

निश्चितच भारतीय हवामान विभागाने मंदोस चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता वर्तवली असून पंजाबरावांनी देखील असाच अंदाज जारी केला जात असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

15 डिसेंबर पर्यंत पडणारा पाऊस हा अवकाळी असून यामध्ये विजेचे प्रमाण अधिक राहणार आहे तसेच यादरम्यान कोसळणारा पाऊस वादळी वाऱ्यासह कोसळणार असून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा म्हणजे जवळपास सर्वत्र हा पाऊस राहणार आहे.

मात्र भाग बदलत पाऊस पडेल असं मत पंजाबरावांनी व्यक्त केल जात आहे. निश्चितच अवकाळी पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने शेतकऱ्यांना अधिक सजग राहावे लागणार आहे. तसेच राज्यात गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस तोडणी मजुरांनी आपले संरक्षण करावे असे देखील यावेळी जाणकारांकडून सांगितले जात आहे.

राज्यात चालूचं रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे, आताच शेतकरी बांधवांनी पेरणीचे कामे पूर्ण केली आहेत आणि  अशातच अवकाळी पावसाची शक्यता पाहता खरीप हंगामाप्रमाणेचं रबी हंगामात देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Panjabrao Dakh Havaman Andaj :पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस”

Leave a Comment