PM KISAN : PM किसान सम्मान निधी योजनेचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा जोरदार सुरु आहे. पण आता लवकरच 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.(PM KISAN )
PM किसान सम्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु आहे. पण लवकरच 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 15 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्यामुळं लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.(PM KISAN)
या तारखेला मिळाला होता 13 वा हप्ता?
याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता जमा झाला होता तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जारी करण्यात आला होता. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते आणि मोदी सरकार हे पैसे दोन हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ही मदत जारी करते.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 14 हप्ता
अनेकांना पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना अद्याप 13 वा हप्ता मिळाला नाही किंवा त्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही अशा शेतकऱ्यांना 14 हप्ता मिळणार नाही आणि यासोबतच जर एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्याचा 14 वा हप्ताही थांबवला जाऊ शकतो. म्हणून, जर तुमची ई-केवायसी झाली नसेल, तर ती त्वरित करा.
ऑनलाईन ई-केवायसी कसे अपडेट करणार?
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे.
2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.(PM KISAN)
हे हि वाचा : डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12 कसा काढावा
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा