पीएम-किसान KYC ई-केवायसीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ 2022 - डिजिटल शेतकरी

पीएम-किसान KYC ई-केवायसीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ 2022

पुणेः पीएम-किसान पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Nidhi Scheme) ११ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC For PM Kisan) बंधनकारक करण्यात झाली  आहे. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि तसेच ई-केवायसी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा मुदत वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येईल पण त्याचा आत करावी.

पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम-किसानचा लाभ अपात्र शेतकऱ्यांनीही घेतला होता. त्यामुळे केंद्राने या शेतकऱ्यांना निधी परत करण्यास सांगितलेले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांनाच लाभ विळावा यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १० वा हप्ता देण्यात आला आहे. मात्र ११ व्या हप्त्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले गेले आहे. परंतु देशभरात आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने ३१ मे पर्यंत मुदत करण्यात आली होती दिली होती आणि ती वाढवून ३० जूनपर्यंत वाढविली. तरीही पूर्ण शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता आले नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा मुदतवाढ हि ककरण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता ३१ जुलैपर्यंत आधार प्रमाणीकरण KYC करता येईल.

केंद्राने शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय २०१८ मध्ये जाहीर केला आहे. यात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत मदत मदत दिली जात आहे. केंद्राने आत्तापर्यंत १० हप्ते शेतकऱ्यांना दिले. दहावा हप्ता देशभरातील ११ कोटी १४ लाख शेतकऱ्यांना दिला आहे. तर सध्या ११ वा हप्ता वितरणाचे काम बर्याच दिवसापासून  सुरु आहे. मात्र आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय ११ हप्ता मिळणार नाही, असे सरकारने जाहिर केले आहे. आत्तापर्यंत १० कोटी ७४ लाख शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्याचे वितरण केले आहे. KYC ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळत आहे. KYC सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी मिळावी यासाठी सरकारने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ केली आहे.

Leave a Comment