एकदम भारी- अवघ्या २९९ रुपयांत तब्बल दहा लाखांचा विमा
पुणे : पोस्टाची भनाट ऑफर पोस्टाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार केला असून प्रति वर्ष २९९ व ३९९ च्या हप्त्यात दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
या योजनेत २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे विमा सुरक्षा कवच हे विमाधारकास प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना ५ हजार रुपये व या पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची हि रक्कम मिळणार आहे.
दोन्ही योजनांत हा आहे फरक
२९९ व ३९९च्या अपघात विमा योजना या सारख्याच आहेत आणि मात्र, ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना शिक्षणासाठी १ लाखांपर्यंतची मदतही मिळू शकते, तर ही मदत २९९च्या अपघात विमा योजनेत मिळणार नाही आणि त्याचप्रमाणे ३९९ योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च, शिक्षण खर्च देण्यात येत असतो. हा खर्च २९९च्या योजनेत मिळत नाही.
योजनेचा कालावधी वर्षाचा
या विमा योजनेंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे आणि म्हणजेच २९९ किंवा ३९९ रुपयात तुम्हाला वर्षभराकरिता सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे.
अर्ज कसा करणार?
यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असतो. तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असावे लागते आणि ते नसल्यास काढावे लागेल.
ही योजना यांनाच लागू
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली गेली आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा ही १८ ते ६५ वर्षे असते.