प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तथापि, केंद्र शासनाने योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 व रब्बी 2022- 23 हंगामासाठी एक वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचारधिन होती आणि त्या अनुषंगाने शासनाने 1 जुलै 2022 रोजी पासून पिक विमा योजना अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
खरीप पिक विमा योजनेची उद्दिष्ट
- नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणाचे काम.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखले जावे.
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नधान्य पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास हे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी केवळ अधिसूचित आणि पिकांसाठीच असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असणार आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेत करणारे शेतकरी या योजनेस पात्र असणार आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा भीमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आलेली आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे.
- उंबरठा उत्पादन हे एक वर्ष कालावधी करिता असेल आणि तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करिता असेल.
- विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पर्यंत चे दायित्व स्वीकारतील आणि तथापि एका वर्षातील देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पेक्षा जास्त असल्यास 110% जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारनार आहे.
- आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेंपेक्षा कमी असेल आणि तर विमा कंपनी विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २०% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करत असते.
पीक विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान किती?
या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात जाणार आहे आणि तथापि सर्व शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामासाठी भरावयाचा प्रती हेक्टर विमा हप्ता दर माहिती असणे आवश्क आहे.
पिक विमा नुकसान भरपाई निकष
- जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल, तर हे विमा क्षेत्र मदतीसाठी पात्र राहणार आहे.
- पिक व पिकांच्या गटासाठी अधिसूचित विमा क्षेत्राकरिता या जोखीम निश्चिती करिता आवश्यक तरतुदींचे पूर्तता करून नुकसान भरपाई देणेबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढावी लागत असते.
- राज्य शासनाचेअधिकारी व पीक विमा कंपनी यांच्या संयुक्त पाहणीनुसार नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई निषेध केली जाणार आहे.
- संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचने अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे आणी किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा करून घेण्यात आलेली आहे. असेच शेतकरी सदर मदतीसाठी पात्र राहणार आहे.
- इच्छुक कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक कर्ज मंजुरी नंतर १५ दिवसाच्या आत सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात केला जाणार आहे.
- तसेच सर्व इच्छुक कर्जदार शेतकऱ्यांना सदरची तरतूद लागू होईल आणि याची सर्व बँकांनी दक्षता घ्यावी.
- बँकांच्या चुकीमुळे विमा संरक्षणापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दायित्व संबंधित बँकेचे असणार आहे.
- अपेक्षित नुकसान भरपाई रकमेच्या २५ % मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे आणि व ही मदत अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.
- जर प्रतिकूल परिस्थिती ही सर्वसामान्य काढणी वेळेच्या १५ दिवस अगोदर आली. तर सदर तरतूद लागू राहणार नाही व नुकसान भरपाई देय होणार नाही आणि नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल.
पिक विमा नुकसान भरपाई चे सूत्र
नुकसान भरपाई रक्कम रुपये= (उंबरठा उत्पादन – अपेक्षित उत्पादन)/ उंबरठा उत्पादन× विमा संरक्षण रक्कम× 25% .
खरीप पिक विमा योजना 2022 साठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा?
1 जुलै 2022 पासून राज्यांमध्ये पिक विमा योजना करता 2022 च्या अर्ज सुरु झाले आहेत. पिक विमा भरत असताना दोन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वतः पिक विमा भरता येत नाही, ते शेतकरी सीएससीच्या माध्यमातून भरू शकतात. आणि जे शेतकरी या ठिकाणी स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शकतात आणि त्यांना फार्मर लॉगिनच्या माध्यमातून पिक विमा भरता येतो.