पंजाबराव डख रावांनी 12 जुलैपर्यंत मान्सून अंदाज वर्तविनायात येत आहे. पंजाब रावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस कोसळणारराहणार आहे. मात्र आज आणि उद्या राज्यात सर्वदूर पाऊस नसणार याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि असे देखील यावेळी पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी सांगितले.
दरम्यान, पाच जुलै पासून राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पंजाब रावांच्या मते 5 जुलै ते 12 जुलै यादरम्यान राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे. आणि या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेले आहेत या शेतकऱ्यांची पेरणी देखील होऊ शकते आणि करावी असा अंदाज पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांनी वर्तवला आहे.
पंजाब रावांच्या मते, पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असून या कालावधीत सर्वाधिक पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यात पाऊस बघायला मिळू शकणार आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विशेषता जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातही पाच ते 12 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव काल यांनी वर्तवली आहे. निश्चितच पंजाब रावांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे आणि पंजाब रावांचा नवीनतम सुधारित मान्सून अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाले दिसत आहेत.
गेल्या महिन्यात म्हणजेचं जूनमध्ये पहिला पंधरवाडा हा जवळपास राज्यात सर्वत्र विनापावसाचा गेला आहे. 10 जून ला राज्यातील तळकोकणात मान्सून (Monsoon) आगमन झालं आहे त्यानंतर 11 जूनला मुंबईत मान्सून (Monsoon News) दाखल झाला होता .
त्यानंतर काही तास मुंबई, मुंबई उपनगर ठाणे व आजूबाजूच्या जिल्ह्यात मोसमी पाऊस (Rain) देखील बघायला मिळाला आहे. मात्र राज्यात इतरत्र जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस झाला नाही. परंतू जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने, राज्यात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
19 जून पासून राज्यात रोजाना भाग बदलत पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील आता बर्या पेकी आटोपल्या आहेत. मात्र असे असले तरी राज्यात अजून काही ठिकाणी मोसमी पावसाची हजेरी लावली नाही आणि अशा भागात अजूनही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नाही.
त्यामुळे सध्या शेतकरी बांधव पेरणी साठी मोसमी पावसाची वाट पाहत आहेत. शेतकरी बांधवांचे सध्या मान्सून अंदाजाकडे बारीक लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज काल (Panjabrao Dakh Havaman Andaz) जाहीर करण्यात आला आहे.