QR code: क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा..! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान.. - डिजिटल शेतकरी

QR code: क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा..! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान..

QR code: भारतात ऑनलाइन पेमेंट खूप सोपे झाले आहे तसेच वापरकर्ते त्यांच्या मोबाइलवरून कुठेही QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकत असतात. सध्या रस्त्यावरील सर्व दुकानांमध्ये QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात आहे.

परंतु युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंटसह ऑनलाइन व्यवहार करणे जितके सोपे आहे तितकेच फसवणूक करणे सोपे झाले आहे अशा परिस्थितीत तुम्ही QR कोड स्कॅन करून पैसे भरताना काळजी घ्यावी लागते, कारण आजकाल OLX वर सूचीबद्ध वस्तू खरेदी करण्यासाठी QR कोड स्कॅन करून पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे.QR code

QR कोडचा गैरवापर कसा होतो?

स्कॅमर सहसा QR कोड पाठवतात आणि पैसे मिळवण्यासाठी लोकांना तो स्कॅन करण्यास सांगतात आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून मोठी रक्कम कापली जाते.

OLX वर ऑनलाइन पैसे स्वीकारण्यासाठी QR कोड स्कॅन करू नका..

स्कॅमर OLX वर तुमच्या वस्तूंच्या बदल्यात ऑनलाइन पेमेंट करण्याचे वचन देतात आणि पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी तुम्हाला QR कोडमधून पैसे घेण्यास सांगत असतात. पण इथे तुम्ही सावध असले पाहिजे की पैसे मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही आणि म्हणून जर कोणी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी WhatsApp किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर QR कोड पाठवत असेल तर तुम्ही तो कधीही स्कॅन करू नका.QR code

 QR कोड घोटाळे कसे टाळायचे

  • QR कोड स्कॅन केल्यानंतर, साइट आणि डोमेन नाव तपासण्याची खात्री करत चला.
  • तुम्हाला QR कोड स्कॅन करून पैसे भरण्यासाठी कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही बहुतेक स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा ॲपमध्ये स्कॅनर असतो. जर कोणी तुम्हाला QR कोड स्कॅन करण्यासाठी ॲप डाउनलोड करण्यास सांगत असेल, तर ते टाळले पाहिजे. तुम्ही QR कोडद्वारे पेमेंट करण्यासाठी तुमचा UPI आयडी किंवा बँक खाते तपशील शेअर करू नका.
  • वापरकर्त्यांनी QR कोडद्वारे पेमेंट करण्यासाठी OTP वापरू नये.

हे हि वाचा : तुम्ही बनवलंय का आयुष्मान कार्ड? मिळतात 5 लाखांपर्यंत फायदे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “QR code: क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा..! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान..”

Leave a Comment