प्रस्तावना
डाळिंबाची लागवड गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे, त्यामुळे दर्जेदार रोपांची मागणीही वाढत चालली आहे. दर्जेदार डाळिंब रोपांच्या निर्मितीसाठी शास्त्रीय पद्धतीने गुटी बांधण्यापासून पिशव्या भरण्यापर्यंत प्रत्येक बाबीकडे लक्ष देणे म्हत्वाचे आहे. डाळिंब रोपे तयार करतना कशी काळजी घावी व डाळिंब ची पद्धत पहावी.
- डाळिंबाची रोपे तयार करताना मातृवृक्षाची निवड अतिशय आवशकता आहे.
- मातृवृक्षाचे वय साधारणपणे 3-३.२ वर्षे असावे.
- मातृवृक्ष निरोगी व तजेलदार असल्यास फांद्यांची साल सहजासहजी निघत असते.
- डाळिंब रोपे तयार करण्यासाठी गुटी बांधावयाच्या मातृवृक्षांना दीड ते दोन महिने अगोदर रासायनिक खत व शेणखताची मात्रा देणे आवश्यक म्हत्वाचे आहे.
- मातृवृक्षाची संपूर्ण इतिहास विशेषतः त्याचा स्रोत, जात, झाडाची वाढ, फळांची संख्या, फळाचा आकार, फळाचा रंग, कीड व रोग प्रतिकारकक्षमता अशा बाबींची तीन वर्षांची माहिती जमा केलेली असणे आवश्क आहे. त्यातून चांगल्या प्रतीची फळे देणारी, निरोगी व सर्व दृष्टिकोनातून उत्तम ठरलेली मातृवृक्षाची निवड हि करता येणे शक्य आहे.
- मातृवृक्षाची नामवंत प्रयोग शाळेत सेरॉलॉजिकल किंवा मॉलिक्युलर मार्कर अथवा बॅक्टेरिया फेजेस इत्यादी पद्धतीने मातृवृक्ष निरोगी तसेच विषाणूयुक्त असल्यासंबंधीची चाचणी करून घ्यावी.
हे हि वाचा :अंजीर लागवड 2022
गुटी बांधण्याची पद्धत
- डाळिंबाची 90 टक्के रोपे ही गुटी कलम पद्धतीने बनवली जात असते.
- पावसाळ्यात (जून ते ऑगस्ट) गुटी बांधल्यास अधिक आर्द्रतेमुळे चांगल्या मुळ्या फुटत असतात. त्याच प्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबर महिनादेखील गुटी बांधण्यास पोषक ठरत आहे.
- मातृवृक्षावरती गुटी कलम बांधण्यासाठी पेन्सिलच्या जाडीच्या आकाराच्या व एक वर्ष वयाच्या सुदृढ फांद्याची निवड करण्यात यावी . निवडलेल्या फांदीवरील डोळे नसलेल्या भागातून 2 ते 2.5 सें.मी. वर्तुळाकार भागातील साल आंतरभागाला इजा न होता काढून घावी. साल काढण्यासाठी धारधार चाकूचा वापर करण्यात यावा.
- साल काढलेल्या भागावर शेवाळ (spnagnmmoss) गोलाकार लपेटून घावे. या शेवाळाची पाणी शोषण क्षमता जास्त मानवत असते. 250 ते 300 गेज जाडीच्या 5 इंच x 6 इंच पॉलिथीनच्या तुकड्याने गुंडाळून बारीक सुतळीने बांधावे. सुतळीने बांधताना संपूर्ण शेवाळ झाकले जाईल याची काळजी पूर्ण घ्यावी. ओल्या शेवाळामुळे कापलेल्या भागावरती ओलावा टिकून राहत असतो.
- गुटी बांधताना मातृवृक्षावरील पाने काढावी लागतात, त्यामुळे मातृवृक्षास इजा झालेली असते म्हणून गुटी बांधून झाल्यानंतर बोर्डो मिश्रण (1 टक्का)ची फवारणी करता येत असते.
- 35 ते 45 दिवसांत पॉलिथीनच्या आतील शेवाळामध्ये पांढऱ्या मुळ्या फुटलेल्या दिसतात.
रोपासाठी/गुटी लागवडीसाठी मातीचे मिश्रण
मिश्रणाचे गुणधर्म
- रोपांना घट्ट आधार देणारे हे असावे.
- मिश्रणांची पाणी धारण क्षमता चांगली असणे आवश्क आहे.
- मिश्रण सच्छिद्र म्हणजेच हवा खेळती असावी.
- मिश्रणात अन्नद्रव्याची उपलब्धता हि पूर्णतः असावी.
- मिश्रणे तणाच्या बिया व हानिकारक जीवजंतूंपासून मुक्त करणे गरजेचे.
- रोपे बनवण्यासाठी पोयटा मातीचा वापर अधिक असणे आवशक.
- 40 टक्के वाळू, 40 टक्के सील्ट व 20-२५ टक्के चिकन मातीचे कण असणारी माती सर्वोत्तम समजली जाते.
- या मातीवर प्लॅस्टिक कागद अंथरून सौर ऊर्जेच्या साह्याने किंवा बाष्प जल प्रक्रियेद्वारा निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यात ऍझोस्पिरीलम, पीएसबी, ट्रायकोडर्मा व्हीरीडी किंवा ट्रायकोडर्मा हरजीयानम 1 किलो, निबोंळी पेंड 5-६ किलो, व्हॅम 200 ग्रॅम प्रति 100 किलो मिश्रणामध्ये मिसळावे.
- गुट्याची लागवड करण्यासाठी 200 गेज जाडीच्या काळ्या रंगाच्या छिद्र असलेल्या 4” x 6” x 2” आकाराच्या पॉलिथीन पिशव्या वरील मिश्रणाने भरून घेतात.
- 1 मीटर रुंदीचे व तीन मीटर लांबीचे 30 सें.मी. खोलीच्या वाफ्यात मातीने भरलेल्या पिशव्या ठेवण्यात याव्या. मातीचे मिश्रण संपूर्ण ओले होईल अशा प्रकारे भरपूर पाणी ददिले जावे.
गुटी कट करणे व पिशवीत भरण
- साधारणपणे गुटी बांधल्यापासून 46 ते 50 दिवसांनंतर मातृवृक्षावरील गुटीतील मुळ्यांना तांबूस रंग येतो. त्यानंतर गुटीच्या खालील बाजूंनी (खोडाच्या बाजूने) शेवाळ बांधलेल्या जागेच्या लगत सिकेटरने कट करावि.
- लागवड करण्यापूर्वी शेवाळावरील पॉलिथीन पेपर काढून गुटी कलमाची मुळे 12 ते 15 सेकंद कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडाझीम 1 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवावी.
- माती मिश्रणाने भरलेल्या पॉलिथीन पिशव्या पाण्याने चांगल्या प्रकारे भिजवून घेण्यात यावी.
- गुटीकलम लागवड करताना शेवाळाच्या वरील बाजूने तीन बोटाचा आधार देत गुटी कलम हलक्या हाताने शेवाळ पूर्ण मातीत झाकले जाईल, अशा प्रकारे व्यवस्थित लावण्यात यावी. अन्यथा मुळे तुटण्याची शक्यता जास्त असते.
- गुटी कलम लागवड केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे.
- 15-१७ दिवसांनी 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग करावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे 15 -१८ दिवसांनी नवीन फुटवे फुटतात. गरजेनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या डाळिंब कलमांचा वापरच लागवडीसाठी हा करण्यात यावा.
- डाळिंब लागवड करातांनी जाणकार वक्ती कडून आवश्य सल्ला घेणात यावा. 2 4 डाळिंबाचे बाग पाहावे.