Rain Forecast : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे आणि काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही (Hailstorm) तडाखा दिला जात आहे.
आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने (Weather Department) दिला गेला आहे.
पावसाची हजेरी ढगाळ वातावरण यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत आणि शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यतील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित राज्यात कमाल तापमान पुन्हा ३० अंशांच्या वर गेले आहे तसेच राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान होते.
दक्षिण कर्नाटकपासून झारखंड पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
राजस्थानपासून उत्तर प्रदेश समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत हवेचा कूमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे आणि या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.Rain Forecast
शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) पहा:
पुणे ३१.४ (१५.८), जळगाव ३३.३ (१८.६), धुळे ३०.० (१६.०), कोल्हापूर ३२.६ (२१.२), महाबळेश्वर २५.४ (१४.४), नाशिक ३०.३ (१५.६), निफाड ३१.६(१४.५), सांगली ३१.६ (१९.४), सातारा ३१.० (१८.९), सोलापूर ३३.०(२०.०), सांताक्रूझ ३३.४ (२३.१),
डहाणू ३२.२ (२१.६), रत्नागिरी ३३.४ (२३.१), छत्रपती संभाजीनगर ३१.३ (१३.३), नांदेड ३१.२ (२०.०), परभणी ३२.०(१९.०), अकोला ३२.९ (१८.२), अमरावती २८.६(१६.५),
बुलढाणा ३१.२ (१७.०), ब्रह्मपूरी ३४.८ (२१.०), चंद्रपूर ३१.६ (२०.८), गडचिरोली ३२.४(१८.६), गोंदिया ३३.० (१७.२), नागपूर ३३.० (१९.०), वर्धा ३३.९(१९.९), वाशीम ३१.६ (१७.६), यवतमाळ ३३.१ (१७.५).
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर.
मराठवाडा : हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ : अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.