तीळ लागवड तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असते आणि तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करत असतात. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून शेणखत मिसळून घेत असतात आणि हे पीक खरीप, अर्धरब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये घेता येत असते. खरीप हंगामामध्ये जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीळ लागवड हि करत असतात. हेक्टरी दीड ते दोन किलो बियाणे लागत असते. आणि लागवडीसाठी एकेटी- 64 या जातीची निवड करावी किवा आपल्या भागात जे तीळ पिक चागले येत असते त्याची लागवड करा. ही जात ८५- 90 दिवसांत तयार होते. हेक्टरी साडे आट ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते आणि यामध्ये तेलाचे प्रमाण 48 टक्के आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम, तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडीची बीजप्रक्रिया करावि लागत असते.
बियाणे फार बारीक असल्यामुळे पेरताना समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख मिसळावी आणि तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करत असतात. तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्रपीक म्हणून घेता येत असते. लागवड करताना तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (२:1) तीळ + कपाशी (3ः1) अशी आंतरपीक पद्धती वापर करावा.
खतांच्या मात्रा
माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्टरी) आणि पूर्ण स्फुरद (25-३० किलो प्रति हेक्टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर २५- 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्टरी) द्यावा. माती परीक्षणानुसार कमतरता असेल तर पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या खतांच्या मात्रा 20-२५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दिल्या असता उत्पादनात वाढ होते.
पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत आणि पेरणीनंतर 1६ -20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवत असतात. आवश्यकतेनुसार दोन- तीन कोळपण्या, खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेववतात. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी पाणी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे आणि ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.