धक्कादायक: जिवंत शेतकरी(Farmer ) कागदोपत्री मृत, बँकेतून ऊसाचे बिल मिळेना पहा काय आहे हा सगळा प्रकार 2022 - डिजिटल शेतकरी

धक्कादायक: जिवंत शेतकरी(Farmer ) कागदोपत्री मृत, बँकेतून ऊसाचे बिल मिळेना पहा काय आहे हा सगळा प्रकार 2022

शहाजहाँपूर – सरकार(Farmer)दरबारी फक्त कागदच बोलतो आणि त्यामुळे कागदोपत्री तुम्ही  कसे आहात हेच महत्त्वाचे असते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका जिवंत शेतकऱ्याला(Farmer)कागदोपत्री मृत घोषित करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली जात आहे. शाहजहाँपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी (Farmer)जेव्हा बँकेत आपले पैसे आणण्यासाठी गेले तेव्हा ते मृत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पीडित शेतकऱ्यालाचांगलाच धक्का बसला आहे आणि यासंदर्भात वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले असून पीडित शेतकऱ्याशी संवादही साधला गेला आहे.

Farmer

एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी(Farmer) म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वृत्ताने मला धक्काच बसला आहे. कारण, बँकेकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये मला मृत घोषित करण्यात आले आहे. याप्रकरणी माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली होती. तिलहर येथील उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात महसूल विभागाचे पथक चौकशीसाठी नेमले गेले आहे. त्यानुसार, २०२१ च्या तिलहर बीडीओंनी संबंधित शेतकऱ्याला मृत घोषित केले होते.

या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत सचिवाचा निष्काळजीपणा समोर आला आहे आणि त्यानंतर, या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर, पीडित शेतकऱ्याला(Farmer) जिवंत असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

हे हि वाचा :दुधाचे मोठे संकट ‘या’ राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment