शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या - डिजिटल शेतकरी

शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या

गेवराई : गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव नामक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केल्याचा धाकादायक प्रकरण समोर आले आहे. हिंगणगाव येथील बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा नावे  होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप जयभवानी कारखाना करणार होते, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे नामदेवा घाई कशाला केलीस, दोन-चार दिवस थांबला असता तर सगळं काही बरं झालं असतं, अशा प्रतिक्रिया व्यक्त  जनतेतून होत आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याने आजवर ५ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी या वर्षी गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील नोंदीच्या उसाबरोबरच बिगर नोंदीचा ऊसही गाळपाचे नियोजन कारखान्याने करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे असून, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही पंडित यांनी जनतेस  केले आहे. जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित या वेळी म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना देण्यात आला आहे. १८ साखर कारखान्यांकडून दरवर्षी जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले जात होते. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या कारखान्यांनी गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे अमरसिंह पंडित माध्यमाशी बोलताना म्हणाले.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर. क्षेत्रावरील उसाची नोंद जयभवानीकडे आहे. नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप जयभवानीकडून करण्यात आले, तर बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होत होता. यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा नावे  होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप होणार होती. मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या उसाचे गाळप करण्यात आले होते  मात्र, यावर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही, असे ते म्हणाले.

सर्व शेतकरी बांधवाना विनती करण्यात येते टोकाचे पाउल उचलताना आपल्या घरचे नातेवाईक मुल मुली यांचा सल्ला घेणे व त्यांचा विचार करणे , काही काळ शांत राहणे, वेळ जाउद्या सर्व काही ठीक होईल.असे आव्हान डिजिटल शेतकरी करत आहे.

 

बापरे हौसेला मोल नाही, शंकरपटाचा राजा ‘साई’ बैल विकला १७ लाख ५१ हजारांत

फुलंब्री (औरंगाबाद) : तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्याच्या साई आणि लक्ष्या या बैल जोडीने अनेक शंकरपट खूप  गाजवले आहेत. यातील साई बैलाची विक्री १७ लाख ५१ हजार रुपयांत विक्री झाली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतीक भोसले नामक शेतकऱ्याने मंगळवारी हा बैल खरेदी केला गेला आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेत बैल विक्री होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना घडली आहे. यामुळे हौसेला मोल नसल्याचे यातून स्पष्ट दिसून  आले.फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील सांडूखा राजेखा (मिस्त्री) हे गेल्या अनेक वर्षांपासून शंकरपटात भाग घेण्यासह त्याकरिता लागणारे तांगे (छकडे)सुद्धा तयार केले आहे . या क्षेत्रात त्यांची तिसरी पिढीही आलेली आहे तसेच आघाडीवर आहे. त्यांनी तयार केलेले तांगे राज्यात सर्वत्र प्रसिद्ध असून, छकडावाले म्हणून ते प्रसिद्ध  झाले आहेत. कोठेही शंकरपट असला तर ते बैलजोडीसह भाग पहिला  घेतात. त्यांच्या बैलजोडीने गेल्या वर्षभरात हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा, नानेगाव (सिल्लोड), घटांब्री या सहा ठिकाणी आयोजित केलेल्या शंकरपटात सहभाग घेऊन पहिला क्रमांक पटकवलाचा मान मिळवला आहे. यामुळे त्यांच्या बैलांची सगळीकडे चर्चा झाली आहे. त्या बैलांची ख्याती ऐकूनच पुणे जिल्ह्यातील चारोळी (ता. हवेली) येथील प्रतीक भोसले यांनी तब्बल १७ लाख ५१ हजार रुपये मोजून यातील एक बैल विकत घेतला आहे. प्रतीक भोसले हे शंकरपटाच्या क्षेत्रात सक्रिय वक्ती आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या या मध्ये  सहभागी होत आल्या आहेत. त्यांच्याकडे चार बैलांची जोडी असून प्रत्येक शंकरपटात ते सहभागी होतात झाले आहेत. तळेगाव येथील बैलजोडीची चर्चा ऐकूनच आपण हा बैल खरेदी केल्याचे त्यांनी लोकमत या नामाकीत वृतपत्र स  सांगितले. आमच्या शंकरपटाच्या दोन बैलांपैकी एका बैलाची आम्ही विक्री केली आहे असे सांगताना . हे बैल गेल्या तीन वर्षांपासून आमच्याकडे आहे. त्यांना दररोज दहा लिटर दूध, अंडे, बदाम, उडिद डाळ, शाळू ज्वारीचा चारा तसेच हिरवा  सकस चारा दिला जात होता . यामुळे त्यांनी अनेक शंकरपट आम्हाला जिंकून दिले आहे असे सांगत असतना  त्यांचा डोळ्यात अश्रू आले.- सांडूखाॅ राजेखाॅ, शेतकरी

 

Leave a Comment