भाजप किसान मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी ः जिल्ह्यातील कृषिपंपांसाठी (Solar Pump)विजेची वाढती गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषिपंप (Solar pump) योजनेअंतर्गत जमीन धारणा क्षेत्राची कोणतीही अट न ठेवता गरजू शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तत्काळ सौर कृषिपंप द्यावेत अशी मागणी होत आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे ताण बसलेल्या पिकांच्या सिंचनासाठी कृषिपंपांना नियमित अखंडित वीज पुरवठा करावा, आदी मागण्या भाजपच्या किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे आणि वाढत्या मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपाचा(Solar Pump) पुरवठा सुरु करावा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना केवळ ३ एचपी क्षमतेच्या पंपाची अट न टाकता शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे पुरवठा करण्यात यावा. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील सिंचन स्त्रोतांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे परंतु महावितरणकडून कृषिपंपांना नियमित अखंडित वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही सिंचन क्षेत्रात वाढ होत नाही असे काहीसे आहे.
यंदा ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाचा दीर्घ खंड पडला आणि जमिनीतील ओलावा नष्ट झाल्यामुळे अनेक(Solar Pump) भागातील सोयाबीनसह पिके करपली आहेत. खरीप तसेच अन्य पिकांना पाण्याची गरज आहे आणि पाणी उपलब्ध आहे. तसेच परंतु वीज पुरवठा सुरळीत राहात नसल्यामुळे पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके वाळत जात आहेत. परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह, पिंपळगाव ठोंबरे, सिंगणापूर, वझुर, ब्राम्हणगाव या गावातील ३३ केव्ही उपकेंद्र तसेच परभणी येथील १३२ केव्ही केंद्रावरून पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा होत नाही तसेच अतिरिक्त वीज वापर होत असल्याने पुरवठा सुरळीत होत नाही. जायकवाडीच्या लाभक्षेत्रामुळे या भागातील पाणी पातळी वर आहे. परंतु बागायतदार शेतकऱ्यांचे विजेअभावी प्रचंड नुकसान होत आहे, अशी व्यथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली जात आहे.
हे हि वाचा :कॅन्सर, हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या आजारापासून राहाल कायम लांब राहाल WHO नं सांगितल्या ५ टिप्स