soybean market rate: दसऱ्याच्या सणानंतर सोयाबीनला हमीभावाच्या आसपास दर मिळताना दिसत आहे आणि यावर्षी पहिल्या सत्रात अतिवृष्टी आणि दुसऱ्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असल्याने दर चढे असतील अशी आशा होती पण हमीभावापेक्षा जास्त दर मिळत नसल्याचं चित्र सध्या बाजारात दिसत आहे.soybean market rate
दरम्यान, कांद्यासहित सोयाबीनच्याही दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून नेहमी हस्तक्षेप केला जातो आणि सोयातेल आयात करून सोाबीनचे दर पाडण्याची सरकारची खेळी यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर वायदेबंदीला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना आगामी बाजाराचा अंदाज येत नसल्यामुळे मोठ्या फायद्यापासून लांब रहावे लागत आहे. तसेच या कारणांमुळे शेतकऱ्यांना हवा तसा दर मिळत नाही.soybean market rate
आजच्या सोयाबीनच्या दराचा विचार केला तर आज बाजारात दर स्थिर होते आणि आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त १६ हजार ६५८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत ४ हजार ६०० ते ४ हजार ७९२ रूपयांच्या दरम्यान दर मिळाला. आज शेगाव-वरोरा बाजार समितीत ३००० रूपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला तर मेहकर बाजार समितीत ५ हजार १६० रूपये प्रतिक्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. दिवाळीच्या तोंडावर दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना आशा आहे.