Soybean : इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने (आयआयएसआर) (Indian Soybean Research Center) बदलत्या वातावरणात तग धरणारी आणि पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीनची एनआरसी १३६ ही जात (Soybean Verity) विकसित केली गेली आहे.
मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे तसेच पूर्व विभागातील काही राज्यांमध्ये येत्या खरीप हंगामात या जातीची लागवड (Soybean Cultivation) होईल, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी दिली गेली आहे.
मध्य प्रदेश सरकारने या नवीन जातीला मान्यता दिली असून पुढील खरीप हंगामापासून लागवड सुरू होईल आणि दहा वर्षांच्या संशोधनानंतर एनआरसी-१३६ ही जात विकसित करण्यात आली आहे. मॉन्सूनच्या कालावधीत दीर्घकाळ खंडामध्ये ही जात तग धरत असते. आणि मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसारणास मान्यता मिळाली आहे.
बिहार सरकारने पुढील हंगामासाठी या जातीचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी मागणी नोंदविली आहे आणि महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या जातीची चाचणी घेण्यात येत आहे. चाचण्यांचे हे दुसरे वर्ष असून, तीन वर्षांच्या निष्कर्षानंतर महाराष्ट्रात या जातीच्या प्रसारणास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सोयाबीन(Soybean) संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेशकुमार सातपुते यांनी दिली आहे.
जातीची वैशिष्ट्ये…
– दाणे भरण्याच्या काळात पावसाचा २० ते २५ दिवसांचा खंड पडला तरी समाधानकारक वाढ होत असते.
– १०२ दिवसांत तयार होत आहे.
– मूगबीन यलो मोझॅक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यमस्तरीय प्रतिकारक आहे.
– प्रति हेक्टरी १७ क्विंटल उत्पादन मिळते.
– ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड राज्यांत पेरणीसाठी प्रसारित आहे.
1 thought on “Soybean Verity : ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित 2022”