Swachh Bharat Mission : शौचालय योजना(Toilet Plan) ऑनलाइन फॉर्म कसा भरावा कोणत्या वेबसाईटवर भरायचा तसेच कसा भरायचा याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जात असते.(Swachh Bharat Mission)
शौचालय योजना(Toilet Plan) ऑनलाइन फॉर्म साठी कोण कोण पात्र असतील ते पाहूया
- दारिद्रय रेषेवरील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती.
- दारिद्रय रेषेखालील सर्व कुटुंब.
- लहान आणि अल्पभूधारक शेतकरी.
- भूमिहीन शेतमजूर.
- शारिरीकदृष्ट्या अपंग.
- महिला कुटुंब.
शौचालय योजना(Toilet Plan) ऑनलाइन फॉर्म साठी खालीलप्रमाणे करा अर्ज
पुढील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये सर्च करा https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा डायरेक्ट पेजवर जाण्यासासाठी येथे क्लिक करता येयील.
यानंतर तुमच्यासमोर एक स्वच्छ भारत मिशन फेस टूचा इंटरफेस दिसेल.(Swachh Bharat Mission)
या ठिकाणी तुम्हाला citizens registration पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करावे लागेल.
नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यावर तिथे तुमचा मोबाईल नंबर तुमचे नाव लिंग पत्ता राज्य परत कॅपच्या कोड हे सगळे टाका आणि सबमिट करावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लॉगीन करा.
वरील प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुमची नोंदणी होईल आणि आता पासवर्ड साठी तुमच्या मोबाईल नंबर चे शेवटचे चार अंक टाका त्यानंतर कॅपच्या कोड टाईप करा आणि लॉगिन या बटणावर क्लिक करा.
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म लॉगीन केल्यावर भरावयाची माहिती.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पासवर्ड बदलण्याची सूचना येईल तो पासवर्ड आधी बदलावा लागेल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला तीन पर्याय दिसतील.
- New Application.
- View Application.
- Change Password.
- यापैकी New Application या पर्यायावर क्लिक करावे.
- तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज ओपन होईल आणि तुम्हाला त्यात माहिती भरायची आहे.
- त्यात तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तुमचा तालुका तसेच ग्रामपंचायत तुमचे गाव ही सगळी माहिती भरायची आहे.
- या सदरासाठी शौचालय मालकाची माहिती Section B Toilet owner’s Particular
- अर्जदाराचे आधार कार्डनुसार नाव टाईप करावे.
- आधार नंबर टाका आणि तो पडताळून घेणे आवश्क.
- वडील किंवा पतीचे नाव टाकावे.
- अर्जदाराने तो पुरुष आहे किंवा स्त्री आहे तो पर्याय निवडावा आणि पोट जात निवडा.
- कार्डाचा पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील APL म्हणजेच Above poverty line व BPL म्हणजे Below poverty line. थोडक्यात APL म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये नसलेला आणि BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असलेला तसेच योग्य तो पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर.
- इमेल आयडी.
- व तुमचा संपूर्ण पत्ता टाईप करा.
- अर्जदाराचे बँकेचे तपशील.
- बँकेचे तपशील भरा.
2 thoughts on “Swachh Bharat Mission: शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज”