Under Integrated Horticulture Development Mission: जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज? 2023 - डिजिटल शेतकरी

Under Integrated Horticulture Development Mission: जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज? 2023

Under Integrated Horticulture Development Mission: राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत गेले आहे.Under Integrated Horticulture Development Mission

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२३ २४ मध्ये जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे आणि राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत गेले आहे.

पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील

नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याची फळपिकांची एकुण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची बाब आहे तसेच सन २०२३-२४ मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ह्या योजनेत यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे आणि या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रू.४०,०००/- प्रति हे. ग्राह्य धरून त्याच्या ५० टक्के प्रमाणे जास्तीत-जास्त रक्कम रु. २०,०००/- प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी ०.२० हेक्टर व कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील आहे.

पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील

तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे लागतील. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.Under Integrated Horticulture Development Mission

महिला सरपंचांच्या पतीच्या लुडबुडीला लागणार लगाम!

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

1 thought on “Under Integrated Horticulture Development Mission: जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज? 2023”

Leave a Comment