whatsApp: मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सॲपवर(whatsApp) अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्समुळे अनेक यूजर्सची फसवणूक होत असल्याचे समोर आले होते.
विशेषतः व्हिडीओ कॉलद्वारे सर्वाधिक झाल्याचेही निदर्शनास आले होते आणि या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने नुकतेच ‘सायलेंट अननोन कॉलर’ फीचर लॉन्च केले आहे . या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जात आहे.
स्पॅम कॉल्स वाढले व्हॉट्सॲपवर अनेकांना २५४, ८४, ६३, २१, ६२ आदी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण बरेच वाढले गेले होते. प्रामुख्याने आफ्रिकी तसेच दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून हे कॉल येत होते आणि या फीचरमुळे यूजर्सना स्पॅम कॉल म्यूट करता येईल.whatsApp
हे हि वाचा ; लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण! एकनाथ शिंदेंची घोषणा; अपघात, आजारपण आल्यास मदत मिळणार
कसे वापराल फीचर?
• सर्वप्रथम व्हॉट्सॲप सुरू करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा
• सेटिंगमध्ये प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा
• त्यात कॉल्स ऑप्शनमध्ये जा. तिथे सायलेंट अननोन कॉलरला इनेबल(चालू) करा