पंजाबराव डख: अमेरिकन हवामान विभागाने यंदा भारताचा संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत. मात्र परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी यंदा गेल्या वर्षी प्रमाणे चांगला मानसून राहील असा अंदाज बांधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ८ जूनला मान्सूनचा आगमन आपल्या महाराष्ट्रात होणार असून 22 जून पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. जवळपास 27 ते 28 जून पर्यंत राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होणार असल्याचा दावा देखील पंजाबरावांनी केला आहे. पंजाबरावांनी पाऊस कसा येतो हे कसं ओळखायचं याबाबत मोठी माहिती दिली असून जाणून घ्या..
🌧️ पाऊस येईल की नाही, हे असं ओळखा..
▪️पंजाबराव डख दिलेल्या माहितीनुसार, जर दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तेथून पुढे तीन दिवसानंतर हमखास पाऊस पडतो.
▪️ आपल्या घरातील लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पावसासाठी पोषक हवामान तयार होते आणि हमखास पाऊस पडत असतो.
▪️ मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या आसपास ज्यावेळी चिमण्या धुळीत अंघोळ करतात अशावेळी तेथून पुढच्या तीन दिवसात पावसाची शक्यता तयार होत असते.
▪️जर आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज येत असेल तर समजायचं की तेथून पुढच्या तीन दिवसात पाऊस हमखास पडतो. त्यांच्या मते जेव्हा पावसाचे ढग वर येतात तेव्हाच विमानाचा आवाज येतो.
▪️तसेच गावरान आंबा जर कमी प्रमाणात पिकला तर अशा वर्षी चांगला पाऊस राहतो.
▪️जून महिन्यामध्ये सूर्यावर तपकिरी कलर आला तर पुढील चार दिवसात 100% पाऊस हा पडत असतो.
▪️ज्या वर्षी चिंचेच्या झाडाला अधिक चिंचा लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण हे तुलनेने अधिक असल्याचे मत यावेळी डखं यांनी व्यक्त केल आहे.
▪️ सरड्याच्या बदलत्या रंगानुसार देखील पावसाचा अंदाज बांधता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, जर सरडा आपल्या डोक्यावर लाल कलर तयार करत असेल तर अशावेळी समजायचं की पुढच्या चार दिवसात हमखास पाऊस पडेल.
▪️ घोरपड ज्याला इंडियन लिझार्ड म्हणून ओळखलं जातं हा प्राणी जेव्हा बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतो तेव्हा तेथून पुढील चार दिवसात पावसाची शक्यता ही तयार होत असते.