पुणे – बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर निकालाचे विविध दावे केले जात असतानाच आता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता, उद्या म्हणजे बुधवार ८ जून रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे. ”महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. बुधवार ८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल,” असं ट्विट त्यांनी केलंय.
असा चेक करा निकाल
विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट भेट द्यावी:
त्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा म्हणजे
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट बटनावर क्लिक करा
तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
तुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा