भारतात 5G इंटरनेट सेवा सुरु, शेतकऱ्यांचा काय फायदा होणार..? - डिजिटल शेतकरी

भारतात 5G इंटरनेट सेवा सुरु, शेतकऱ्यांचा काय फायदा होणार..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशात 5G सेवेचा प्रारंभ केला. दसऱ्यापासून भारतातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. मात्र, ग्रामीण भागापर्यंत या सेवेचा विस्तार झाल्यास, कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

ड्रोनचा वापर वाढणार

5G सेवे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला जाईल. औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. या सेवेमुळे अचूकता वाढेल. मॅपिंग करणं अधिक सोपं जाईल. पिकाचं निरीक्षण करणं अधिक सोपं जाईल.

मालाची किंमत समजेल

शेतकरी पिकांची विक्री चांगल्या पद्धतीने करू शकतील. ‘ई-नाम’ पोर्टलवर शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमत समजू शकेल.

हवामान अंदाज

5G नेटवर्कद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती वेगाने मिळू शकेल. त्या आधारे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान कमी करता येईल.

सरकारी योजनांचा लाभ

ग्रामीण भागात खराब नेटवर्कमुळे सरकारी योजनांची माहिती मिळत नाही. 5G सेवा सुरु झाल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या सरकारी योजनांची माहिती मिळेल. त्यासाठीचे फॉर्म भरुन योजनांचा लाभ घेता येणार आहे.

हे हि वाचा : शेतीबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांचा होणार फायदा..

तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा

Leave a Comment