मध्य महाराष्ट्राला जोरदार पाऊसाची शक्कता एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या
महाराष्ट्राला जोरदार पाऊसाची शक्कता राज्यात मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात येत आहे आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याचाही यात समावेश होत आहे. राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात येत आहेत.

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित भरपूर पाऊस झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात येत आहेत. १४ हजार ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११६ नागरिकांना जीव गमावला आहे, तर २३१ च्या पुढे प्राणी दगावले आहेत. आतापर्यंत पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत नुकसान : तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी शनिवारी अधूनमधून पावसाच्या सरींची नोंद झाली आहे. पश्चिम आणि पूर्व उपनरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, शहरात पावसाने उसंत घेतली आहे आणि शहराच्या काही भागांत चक्क कडक ऊन पडल्याने घामाच्या धारा वाहात होत्या.
उरुरीत महाराष्ट्र पाऊस दमदार हजेरी लावत आहे. येत्या २४ तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.
हे हि वाचा : कीटकनाशकांविना करा पिक संरक्षण हे उपाय केले तर ५०% फायदा होईल