कीटकनाशकांविना करा पिक संरक्षण 2022 ( Crop protection without pesticides ) - डिजिटल शेतकरी

कीटकनाशकांविना करा पिक संरक्षण 2022 ( Crop protection without pesticides )

 

पिक संरक्षण ( Crop protection ) हा शैती व्यवसायातील महत्त्चाचा घटक मानला आहे. पिक संरक्षण  कीटकनाशकाचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि पद्धती अमलात आणण्याची जास्त गरज आहे. म्हणूनच निसर्गाचे संतुलन राखून पिक संरक्षण करण्यासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर, पिकांची लागवड, पिकांचा फेरपालट या बाबींचा अवलंब आवश्यक आहे आणि पिक संरक्षण   कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

नमस्कार शेतकरी मित्रोनो,आपण साद्यास्तीती मध्ये रोग राई ला खूप त्रासलो आहोत, कोणतेही पिक केले कि रोग हा पडतच आहे.त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पन मिळत नही.या मुळे होणारी हनी हि आपल्याला परवडणारी नही.पेसे जाऊनही पिक नियंत्रण मध्ये येत नही. औषधी फवारणी खूप महाग तसेच कष्टाचे झाले आहेत.त्यामुळेकीटकनाशकांविना करा पिक संरक्षण करणे गरजेचे आहे तर आज आपण ते पाहणार आहोत कसे कराल नियोजन

मशागत पद्धत ( Cultivation method )

निरोगी व स्वच्छ बियाण्यांचा वापर करायला हवा. कुजलेले शेणखत वापरावे आणि  खते व पाण्याच्या मात्रा शिफारशीनुसार दिले पाहिजे. जास्त नत्र अथवा पाणी दिल्यास काही किडींची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. योग्य वेळी आंतरमशागत केल्यास जमिनीतील काही किडींचा बंदोबस्त होतो आणि  तसेच तणांवर काही काळ जगणा-या किडीसुद्धा कमी होत असतात आणि मागील पिकांचे अवशेष हंगाम संपल्यावर त्वरित जाळावेत. कारण त्यामध्ये किडींचे अवशेष असतात आणि जमिनीची खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीत खोलवर असणा-या कीटकांच्या अवस्था मरतात.

भौतिक पद्धत (Physical method )

धान्य साठवण्यापूर्वी ते कडक उन्हात वाळवून ठेवत असतात. त्यामुळे धान्यातील कीटक व त्यांच्या विविध अवस्थांचा नाश होत असतो. शिवाय, धान्यातील ओलावा कमी झाल्यामुळे त्यात किड व बुरशीची वाढ़ होत नसते.

यांत्रिक पद्धतकपाशीच्या शेतात सुरवातीला शेंडा पोखरणारी अळी उपद्रव करत असते. अशा वेळी फवारणीपेक्षा प्रादुर्भावग्रस्त शेंडे बोटांनी दाबून आतील अळी माराची अथवा शेंडे तोडून जाळावेत किंवा जमिनीत खोल गाडत असतात. या किडींचे पर्यायी खाद्य/तण वनस्पतींचा नाश करात असतात.

वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर५ टक्के निंबोळी अर्क तथार करण्याची पद्धत खालील प्रमाणे

Use of botanical insecticides The method of preparing 5 percent neemboli extract is as follows

  • निंबोळ्या : उन्ह्यळ्यात (पावसाळ्याच्या सुरवातीला) निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात व चांगल्या वाळवून साठवून ठेवण्यात येत असतात.
  • कडूनिंब : कडूनिंबामध्ये अॅझेंडायरेक्टीन नावाचाघटक आहे. यामुळे कीटक अन्न खात नाहीत व अंडी घालण्यावर प्रतिबंध होतो आणि निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे घाटेअळी, पांढरी माशी, मावा, तुड्तुडे व इतर रोगांचे नियंत्रण होत असते.
  • साबणाचा चुरा: फवारणीच्या आदल्या दिवशी ५ किलो निंबोळी चुरा ९ लिटर पाण्यात भिजत टाकावा तसेच एक लिटर पाण्यात साबणांचा चुरा भिजत टाकाचा असतो.

 

  • तंबाखू: तंबाखूचा अर्क पाण्यात मिसळून फवारल्यास खोडकिडा, पाने खाणारी अळी, तुड्तुडे, कोळी यासारख्या किडींचा बंदोबस्त होत आहे.

 

  • लसूण : मिरची व लसूण यांचा अर्क एकत्र करून फवारला, तर घाटेअळी, मावा यांचे नियंत्रण होत असते.

 

  • करंज व तुळस : यांचा अर्क फवारल्यास फुलकोबी, मिरची, टोमॅटी यांचे सडणे तसेच कापूस व मिरचीवर येणारे डाग या रोगांचे नियंत्रण होत असते.

 

  • शेण व गोमूत्र : यामधील बुरशी प्रतिबंधक तत्च भुरी, करपा व यासारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी होत असतो.

 

  • झेंडू : भाजीपाला व इतर पिकांसोबत झेंडूची लागवड केल्यास तुङ्तुडे, माचा, मर रोग आणि सूक्षकृमींच्या नियंत्रणासाठी वापरत असतात.

 

ई) सापळ्यांचा वापर : किडींचे अवलोकन आणि काही प्रमाणात नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे, लैंगिक आकर्षण सापळे, रंगसापळे पिक यांचा वापर करण्यात येत असतो.

 

फ) पिकांचा फेरपालट : ब-याचसे किडी व रोग हे एका पिकापुरतेच मर्यादित असतात आणि  त्याच पिकाची लागवड सतत केली, तर तिथे रोग आणि किडींचे प्रमाण वाढते म्हणून; पिकांचा फेरपालट करून रोग आणि कीड यांचे नियंत्रण करता येत असते.

कीड नियोजन करतानी शकतो कृषि साहायक यांचा सल्ला घावा. तसेच माती परीक्षण करावे. त्यातील खत मात्रा,गंधक,नत्र , तसेच चून खडक याची सगली माहिती घेऊन पिक घेण्यात यावे त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते व रोग राई कमी होण्यास मदत होत असते. शकतो असे पिक करा कि एका पिकापासून दुसर्या पिकन वर त्याच्या रोगागा परिणाम होणार नही असे पिक करण्यात यावे. अंतर पिक केल्याने बरचसे रोग राई कमी होण्यास मदत होत असते.

हे हि वाचा : भुईमुग पिक संरक्षण

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “कीटकनाशकांविना करा पिक संरक्षण 2022 ( Crop protection without pesticides )”

Leave a Comment