Steel Rate Today: लोखंडाचे दर झाले कमी घर बांधकाम बांधणी साठी आनंदाची बातमी 2022 - डिजिटल शेतकरी

Steel Rate Today: लोखंडाचे दर झाले कमी घर बांधकाम बांधणी साठी आनंदाची बातमी 2022

Steel Rate Today : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला आहे. सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले आहे. सिमेंट, वाळू, स्टील या सर्व वस्तुंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे . पण सध्या घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वीच स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली होती.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी खर्च कमी होणार आहे आणि स्टीलच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या सहा महिन्यात ४० टक्क्यांनी किमती कमी झाल्या आहेत तसेच सध्या स्टील ५७,००० रुपये प्रति टन असा आहे. याचा सर्वात मोठा परिणाम रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात दिसून येणार आहे आणि स्टील महाग झाले की बांधकामाचा खर्च वाढतो आणि स्वस्त झाला की तुमच्या खिशाचा भार कमी होतो त्यामुळे आता घर बांधण्याची ही मोठी संधी आहे Steel Rate Today.

एप्रिल २०२२ च्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती ७८,८०० रुपये प्रति टन वर पोहोचल्या होत्या आणि त्यावर १८ टक्के जीएसटी लावल्यास त्याचा दर सुमारे ९३,००० रुपये प्रति टन होतो. दिवाळीपूर्वी स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सध्या स्टीलची किंमत ५७,००० रुपये प्रति टनावर आली आहे. एप्रिलच्या अखेरीस स्टीलच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली. अवघ्या दोन महिन्यांत त्याची किंमत जूनअखेर ६०,२०० रुपये प्रति टनावर आली होती Steel Rate Today.

  • महाराष्ट्र ५५,१०० रुपये टन
  • हैदराबादमध्ये ५०,००० रुपये प्रति टन
  • राजस्थानमध्ये ५३,१०० रुपये/टन
  • मध्यप्रदेश ५४, २०० रुपये प्रति टन
  • दिल्लीत ५३, ३०० रुपये टन
  • उत्तर प्रदेश ५५,२०० रुपये टन
  • छत्तीसगड ५०,००० रुपये प्रति टन 

हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

1 thought on “Steel Rate Today: लोखंडाचे दर झाले कमी घर बांधकाम बांधणी साठी आनंदाची बातमी 2022”

Leave a Comment