LPG Cylinder : महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा नवी किंमत - डिजिटल शेतकरी

LPG Cylinder : महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा नवी किंमत

LPG Cylinder : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे तसेच केंद्र सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली गेली आहे. सरकारनं कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात केली जात आहे. १ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ११५.५० रूपयांची कपात केली आहे. परंतु घरगुती सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. ६ जुलैपासून सद्या तरी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या एलपीजी (LPG Cylinder) सिलिंडरचे नवे दर १७४४ रूपये झाले आहे आणि यापूर्वी १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरसाठी १८५९.५० रूपये मोजावे लागत होते. चेन्नईत कमर्शिअल एलपीजी सिलिंडर यापूर्वी २००९.५० रूपयांना मिळत होता. दर कपातीनंतर (LPG Cylinder)याची किंमत आता १८९३ रूपये झाली आहे तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडर आता १९९५.५० रूपयांना मिळणार आहे.

दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही आणि कोलकात्यात घरगुती सिलिंडरची किंमत १०७९ रूपये, चेन्नईत १०६८.५० रूपये आणि मुंबईत १०५२ रूपयांना (LPG Cylinder) मिळतो. देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला १४ किलोच्या घरगुती तसेच  १९ किलोंच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करत असतात. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात २५.५ रूपयांची कपात केली होती.

हे हि वाचा : Google ने Play Store वरून हटवले ‘हे’ 13 ‘खतरनाक अ‍ॅप्स’, आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment