Goat Farming Scheme: शेळीपालन योजना 2022 - डिजिटल शेतकरी

Goat Farming Scheme: शेळीपालन योजना 2022

🐐 Goat Farming Scheme: शेळीपालन व्यवसायातून कमाईची संधी, राज्य सरकारच्या योजनेबाबत जाणून घ्या..!!

💰 पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु करण्यात आली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

💁🏻‍♂️ इथे करा ऑनलाईन अर्ज – 👉🏻 http://mahamesh.co.in/ 

✅ शेळीपालन योजनेसाठी अटी

▪️ शेळी पालन सुरु करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 9000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक, ज्यात 100 शेळ्या व 5 बोकड ठेवता येतील तसेच चारा पिकवता येईल.( Goat Farming Scheme)

▪️ योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती / एलपीसी / भाडेपट्टा करार / 9,000 चौरस मीटर जागेचा दृश्य नकाशा सादर करावा लागणार आहे.

▪️ स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतील आणि एक लाखाचे कर्ज घेतल्यास, एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणताही दस्ताऐवज द्यावा लागेल.

👳🏼‍♂️ अर्जदारासाठी पात्रता

▪️ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येणार आहे.

▪️ पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात असते.

▪️ शेळीपालनाचा अनुभव असावा स्वतःची जमीन असणे आवश्यक.

▪️ अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

💁🏻‍♂️ इथे करा ऑनलाईन अर्ज – 👉🏻 http://mahamesh.co.in/ 

हे हि वाचा : कुक्कुट पालन व्यवसायातुन बेरोजगारांना मिळेल रोजगार

Leave a Comment