Land Record: मित्रांनो आपण पाहत असतो की, अनेक लोकांची शेत जमिनीच्या बांधावरून भांडणे सदत काही न काही कारणामुळे चालू असतात. आपल्या शेत जमिनीवर कोणी तरी कब्जा करण्याचा प्रयत्न करतो कि काय. बरेच लोक हे शेजारचा बांध कोरण्यात एक्स्पर्ट असतात. त्यामुळे अशा लोकांना कायदेशीर धडा शिकवे खूप आवश्यक असते. जर कुणी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले असेल तर आपण कायदेशीर पद्धतीने ते काढू शकतो भांडण न करता. त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आपण शेत जमीन वरील अतिक्रमण हे कायदेशीर पद्धतीने कसे काढले जातात या विषयी संपूर्ण माहिती माहित करून घेणार आहोत कायद्याने चालत तर फायद्यात रहाल त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.Land Record
अतिक्रमण म्हणजे नेमके काय :-
थोडक्यात अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिस्यात घेणे त्यांच्या जमिनीवर ताबा करून ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःचीच आहे असे भासविणे होय त्यास अतिक्रमण म्हणतात. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात अतिक्रमण हे बऱ्याच ठिकाणी सतत पाहायला मिळत असते. ग्रामीण भागात अगदी सख्खी भावंडे ही बांधा साठी कायम भांडत असतात. जर आपल्या बांधावर खुणा नसेल तर शक्यतो अतिक्रमण करण्याचे किंवा बांध कोरणाऱ्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमणात असते.

अश्या लोकांमुळेच आपली बाजू बांधा साठी खूप जास्त प्रमाणात वादविवाद सुरु होत असतात.बरेच शेतकरी वर्ग या अतिक्रमणाच्या समस्येपासून जात आहेत, परंतु या शेतकऱ्यांना हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कसे काढावे या विषयी पूर्णतः माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असते. मोठं मोठी भांडणे हाणामारी होत असतात. त्यामुळे जर अतिक्रमण हटविण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहीत असल्यास आपण कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आळा- शिक्षा घालू शकतो.Land Record
आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले की नाही ते कसे ओळखावे हे पहा :-
जर तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत असे वाटत असेल तर ते कायदेशीर पद्धतीने मोजणी करून चेक करू शकतात. ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करून घ्यावी. जमिनीची शासकीय मोजणी केल्या नंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा क प्रत ही शासकीय यंत्रणा तफे अधिकारी यांच्या देण्यात येत असते. त्या नकाशा क वर तुमच्या जमिनीची सर्व बाजू दाखविल्या जातात आणि त्याच बरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र सुद्धा दाखविले त्यात जात असते. शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरून अर्ज करावा लागतो. त्यासाठी फी सुद्धा भरावी लागेल.
खालील पद्धतीने काढा शेत जमीन अतिक्रमण
अश्या वेळेस जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेला शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे रीतसर अर्ज करू शकतात. तुम्ही तहसिलदार यांच्याकडे अर्ज महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३८ नुसार हा करू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तहसिलदार यांच्याकडे करावयाचा आहे.
अधिक वाचा : शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2022
शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी:-
१)जो शेतकरी अर्ज करणार आहेत, म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण झालेले आहेत, आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा कच्चा नकाशा हा जोडणे आवश्क आहे.Land Record
२) जर अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली असेल तर शासकीय मोजणी ची प्रत किंवा जमिनीचा मुळ नकाशा जोडावा लागत असतो.Land Record
३) ज्या जमिनीवर अतिक्रमण हे झालेले आहे, त्या शेत जमिनीचा चालू वर्षातील सातबारा हा जोडण्यात यावा. हा सातबारा हा अर्ज करण्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतील सातबारा जोडणे म्हत्वाचे आवश्यक आहे.
४) अतिक्रमण झालेल्या जमिनीचे जर कोर्टामध्ये केस असेल तर त्या संबंधित सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडे अर्जासोबत सादर करण्यात यावी.
५) अर्ज करताना अर्जदाराने त्यांच्या अर्जामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर आणि गट नंबर आवश्यक टाकण्यात यावा तसेच जमिनीची चतु:सीमा हि टाकावी.Land Record
६) अर्जदाराला अर्ज करताना कोर्ट स्टॅम्प लावावा लागतो आणि तहसील कार्यालयात जाऊन रीतसर पावती घ्यावी.
हि सर्व माहिती आपल्या जवळच्या तलाठी कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करू शकता तसेच आपल्या विश्वासू वक्ती किवा जाणकार माणसाकडून माहिती घेऊन मगच अर्ज करावा. कायदेशी गेले तर वेळ लागेल पण कायदेशीर पणे आपली जमीन हि नक्की भेटेल आणि आपापसातील भांडणे हि मिटतील.Land Record
nice info