Land Record:शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2024 - डिजिटल शेतकरी

Land Record:शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2024

शेतरस्ता

  • Land Recordशेतकऱ्यांना(farm road)शेतात शेत कसण्यासाठी स्वतः किंवा मजुरांना घेऊन जावे लागते ,बी ,बियाणे,खत,असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलगाडी किंवा ट्रॅक्टर वापरावा लागतो परन्तु मुजोर लोक आपल्या बांधावरून जाण्यास अडवणूक करत असता व त्रास देयला सुरुवात करतात.
  • शेतकरी(farm road)जर तो रस्ता पूर्वापार वापरत असेल तर कुणालाही म्हणजे त्या जमीन मालकाला अडवणूक करता येत नाही. त्या साठी तहसीलदारा कडे मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 कलम 5 नुसार वादपत्र (अर्ज) दाखल करून घ्यावा या मध्ये रस्ता अडविनाऱ्यास प्रतिवादी करण्यात यावे,
    अडवणूक केल्याची घटना कशी घडली सविस्थर तारीख व वेळेसह सविस्तर लिहावी, त्यात साक्षदार असल्यास नाव टाकावे,अर्जा खाली सत्यापन (verification )करावे योग्य ती तिकीट लावावी.
  • सोबत ,दोन्ही शेताचे सातबारा जोडण्यात यावा ,कच्चा नकाशा तलाठ्यांकडून घेऊन जोडावा असल्यास साक्षदारांचे नाव द्यावेत.Land Record
  • हा अर्ज अडवणूक केल्याच्या घटनेपासून पासून 6 महिन्याच्या मुदतीत दाखल करण्यात यावा.
  • जुना रस्ता असून तो अडवू नये या साठी तहसीलदारांना मामलेदार न्यायालय कायदा 1906 कलम 5 नुसार शेतकऱ्यांना रस्ता पुर्ववत करून देण्याचा अधिकार दिला आहे संपूर्ण परिपत्र वाचून दाखल करावा .
  • तसेच जुना रस्ता जरी नसेल तरी तुम्हला रस्ता हवा असेल तर जमीन महसूल कायदा कलम 143 नुसार
    कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्त्याची मागणी करता येत असते. ही मागणी तहसीलदार यांना लेखी अर्ज सोरुपात करावी लागत असते.
  • वहिवाट कायदा 1982 कलम15 नुसार 20 वर्षं अधिक काळ कोणत्याही रस्त्यावरून मग तो शेतात जाण्याचा असो की घराचारस्ता असल्यास त्या रस्त्यावरुन जाण्यासाठी अधिकार प्राप्त होत असतो. तो अडविल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो किवा करा.Land Record
  • रस्त्यावरून जातांना अडवणूक करणे हा भा द वि कलम 341 नुसार गुन्हा ठरत असतो.
  • शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवू नये या साठी लेखी अर्ज तहसीलदार न्यायालयात वरील तरतुदी नुसार कायदा करता येतो किंवा दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया कायदा ऑर्डर 39 रूल 1 व 2 नुसार तात्पुरत्या मनाई आदेशा साठी लेखी अर्ज व निरंतर मनाई आदेशा साठी दावा दाखल करता येत असतो याची पूर्ण माहिती हि आपल्या जवळच्या तलाठी कार्यालय येथून मिळू शकते.Land Record
  • या सर्व कारवाई साठी तालुक्यातील जाणकार वकिलाची मदत घेतल्यास चांगले तसेच तलाठी यांच्या सल्यानी विचार करून घ्यावा.Land Record

हे हि वाचा : कोणी तुमचा शेत जमिनीचा बांध कोरत तर नही न 2022

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा.

18 thoughts on “Land Record:शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2024”

  1. शेतरस्ता एकाच शेतकयर्याच्या शेतातून अतिक्रमण केल्यास काय करावे

    Reply

Leave a Comment