Papaya cultivation: पपई नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येत असतात. पपई एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळत असतात. Papaya cultivation
फुले पिवळी असतात; नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसून येतो. त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असतात. स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसत असतात. त्यात वंध्य केसरदले आढळतात; किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क दिसत असतो फळ पौष्टिक व उत्तम खाद्य स्वादिष्ट आहे. Papaya cultivation
त्यामध्ये पेक्टीन, अ आणि क ही जीवनसत्त्वे व पेपेन नावाचे प्रथिन-पाचक (प्रथिनाचे शरीरात पचन होण्यास मदत करणारे) पाचक द्रव्य असते. पपई हे सतत हिरवे गार रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले होते. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलीया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत मोठ्या प्रमाणात होते.
भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १०,८४८ हेक्टर असून सर्वात जास्त क्षेत्र (३,८९० हे.) बिहार राज्यात आहे. आसाममध्ये २,०४६ हे., मध्य प्रदेशात २,५०० हे. आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून १,२८० हे. क्षेत्र आहे आणि इतर राज्यांत १,४८१ हे. क्षेत्र आहे. Papaya cultivation
हवामान
कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली प्रमाणात होते. थंडी २° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव गोड नसतात.
जमीनपपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली प्रतिची असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढत असते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नसते. पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.
लागवड
रोपे पद्धत्ने लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी भुसभुशीत वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.
रोपे तयार करणेचांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवत असतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले प्रती चे असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु दोन महिने रोपांसाठी बी पेरतात १ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५०-३०० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे १० – १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. Papaya cultivation
दोन खड्ड्यांमध्ये २-४ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-७० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी होत असते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावली जातात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येत असतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकत असतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळत असते. Papaya cultivation
1 thought on “Papaya cultivation: पपई लागवड 2022”