अनेकवेळा असं होती की ATM मधून पैसे काढताना ट्रॅन्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतरही पैसे बाहेर येत नसतात. अशा वेळी खूप गोंधळल्यासारखं होत असते. पण अशी परिथिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम काय करायला पाहिजे? आपले अडकलेले पैसे परत कसे मिळवायचे आहे ते पाहूया?
सर्वप्रथम काय करायला हवे?
- तुमचं बँक अकाऊंट असलेल्या बँकेत जाऊन तक्रार दाखल करणे.
- तक्रार दाखल करताना तुम्ही कुठल्या बँकेच्या ATM मध्ये गेला होतात, तसेच त्या ट्रॅन्झॅक्शनचा मेसेज किंवा रिसिटही तुमच्या बँकेत तक्रारीसोबत जमा करणे.
- तुमचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये काही दिवसांतच पुन्हा डिपॉझिट होतील.
तरीही पैसे जमा झाले नाही तर काय कराल?
- RBI’च्या नियमांनुसार तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत बँकेने ग्राहकाला त्याचे पैसे परत करणं बंधनकारक असते. जर असं झालं नाही तर ग्राहक नुकसान भरपाईची मागणी करु शकत आहे.
आरबीआयच्या नियमांनुसार, जर ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यानंतरही 30 दिवसांच्या आत ग्राहकाने तक्रार दाखल केली नाही, तर ग्राहक नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र ठरत नसते.
आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात