Bajaj Auto: बजाज ऑटो आता दुचाकी उत्पादनात बदल करत आहे, देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या वाहन पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या संदर्भात माहिती दिली गेली आहे. नवीन बजाज पल्सर रेंज (Bajaj Auto) तसेच १०० सीसी सेगमेंटमधील सीएनजी बाइकचे संकेत त्यांनी दिली आहे. राजीव बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सीएनजी वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती केली गेली आहे.
एका अहवालानुसार, बजाज ऑटो या आर्थिक वर्षात त्यांची पल्सर श्रेणी अपग्रेड करण्याबरोबरच आजपर्यंतची सर्वात मोठी पल्सर बाइक देखील लॉन्च करेल आणि बजाज ऑटोचे या सेगमेंटमध्ये नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे लक्षात घेऊन कंपनी पल्सर रेंजमधील नवीन मॉडेलसह ६ अपग्रेड्स देण्याची योजना आखत आहे.
बजाज पल्सरने(Bajaj Auto) ही बाईक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या बाईकने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेल्या लोकप्रियतेचा फायदा कंपनी अजूनही घेत आहे. आता हेवी इंजिन असलेली नवी बजाज पल्सर सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत राजीव बजाज सांगतात, “आम्हाला वाटते की आमच्याकडे एक चांगले उत्पादन आहे, आणि ते या आर्थिक वर्षात लाँच केले जाईल.”
पण कंपनीने अजुन कोणतीही तांत्रिक माहिती शेअर केलेली नाही आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 250cc पर्यंतच्या पल्सर उपलब्ध आहेत. कंपनी ४०० सीसीची बजाज पल्सर लाँच करू शकते तसेच बजाज डोमिनार आधीपासून ४०० सीसी सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे.
या अगोदरही बजाज ऑटोच्या सीएनजी बाईक संदर्भात चर्चा झाल्या होत्या आणि एप्रिल २००६ मध्ये, राजीव बजाज यांनी सूचित केले होते की कंपनी नवीन उत्पादनावर काम करत आहे. पेट्रोलशिवाय सीएनजीवरही चालणार आहे तसेच या बाईकमध्ये दुहेरी इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता सीएनजी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत असताना बजाज ऑटो सीएनजी बाईकची तयारी करत आहे की काय, या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला गेला आहे.Bajaj Auto
हे हि वाचा : विहीर मोटार अनुदान योजना