Bamboo Planting: बांबू लागवड आणि तोडणी 2022 - डिजिटल शेतकरी

Bamboo Planting: बांबू लागवड आणि तोडणी 2022

Bamboo Planting:बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदांपासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें.मी आकाराचे खड्डे खोदून ठेवण्यात यावे. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत आणि कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवण्यात यावा.

पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळून घ्या. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावण्यात यावे. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे आणि निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करण्यात यावे. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण काळजी घावी.

दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/ कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत आणि त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे आणि कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. Bamboo Planting

बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होत असते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें.मी. उंचीवर कापण्यात यावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात आणि एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत तसेच पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत. Bamboo Planting

हे हि वाचा : शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment