Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना 2022-23 - डिजिटल शेतकरी

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना 2022-23

Bhausaheb Fundkar Scheme: पाऊस काही ठिकाणी सुरु होण्यास सुरुवात झाली आहे तर  काही शतकरी फळबाग लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड लाभ घेऊ शकता. मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घेयचा असेल,तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर ,कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नाच्या उत्तरे आम्ही आज तुम्हला देणार या लेखात देणार  आहोत. त्यासाठी लवकरच रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या आणि फायदा मिळवा . Bhausaheb Fundkar Scheme रजिस्ट्रेशन पासून ते अर्ज भरून पेमेंट पर्यंतची सर्व माहिती आज आपण पहाणार आहोत. आणि अर्ज करून या  योजनांचा लाभ नक्की घ्या.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23

महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जात असते.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरत आहेत. महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी येथे आहेत.  त्यांना जॉब कार्ड नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नसतात. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२-२३  पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारी  आहे.  तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग शेतीला हि प्रोत्साहन मिळणार हे  आहे.

Bhausaheb Fundkar Scheme भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हि योजना  २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ यातून  देण्यात येणार आहे.

या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात हे अनुदान  देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% असणे म्हत्वाचे आहे. हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे म्हत्वाचे आहे. आणि  अश्याप्रकारे शेतकऱ्याला १००% अनुदान ३ वर्ष्यात फळबाग लागवडीवर मिळणार आहे .

अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य जास्त दिले जात  आहे.

या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हेक्टर तर इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हेक्टर  क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.

 

हे हि वाचा :यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2022

हे हि वाचा :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती online 2022-23 अर्ज

 

नोट :

Bhausaheb Fundkar Scheme या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

सदर मंजूर शासन निर्णयामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १००००.०० लाख मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४० टक्के च्या मर्यादित म्हणजेच रु. ४०००. ०० लाख एवढ्या रकमेस प्रशासनाकडून मान्यता दिली आहे. एकूण ४००००. ०० लाख निधीपैकी रु. २०००. ०० लाख निधी यापूर्वीच कृषी आयुक्त कार्यालयास वितरित करण्यात आला आहे. आणि उर्वरित रुपये. २०००. ०० लाख निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्प वितरित करण्याचा नवीन शासन निर्णय २२ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आला.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे  :

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे म्हत्वाचे आवश्यक आहे.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे आणि संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
  • शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे प्रथम गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येणार आहे.
  • ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक देणे आहे .
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र यात आहेत.
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येणार आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा किवा शेतू कार्यालय CSC  सेंटर ला भेट द्या. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा चला.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा