Mechanization Scheme: यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2023 - डिजिटल शेतकरी

Mechanization Scheme: यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2023

Mechanization Scheme योजनेची माहिती-

Mechanization Scheme: ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असतो.

या योजने मध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान वेगवेगळे  दिले जाते.

उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर,

स्वयंचलित औजारे;-

रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड) इत्यादी

ट्रॅक्टर चलीत औजारे

उदाहरणअर्थ :  रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, या मध्ये इत्यादी अवजारे.

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे

उदाहरणअर्थ: मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर, या मध्ये इत्यादी अवजारे.अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.Mechanization Scheme

अनुदान किती टक्के मिळते-

अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळते आणि इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळत असते. Mechanization Scheme

मात्र राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीतअल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा  याना 60 टक्के व इतर लाभार्थी याना 50 टक्के अनुदान मिळत आहे. अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही ती वेगळी द्यावी लागते. त्याच प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी 60 टक्के, 24 लाख रुपये  पर्यंत अनुदान मिळत असते.

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात पहा खाली दिल्या प्रमाणे-

7/12 व 8 अ, बँक पास बुक, आधार कार्ड, यंत्राचे कोटेशन, परिक्षण अहवाल, जातीचा दाखला इ. कागद पत्रे लागत असतात.ते आपल्या कडे हवे.

अर्ज कुठे करावा –

अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरता येईल तसेच जवळचा csc किवा शेतू मध्ये भरता येईल.

शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकत आहे. या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा असतो. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध या मध्ये आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे असते. आणि त्यानंतर लॉगइन करुन आपल्याला आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आपणास  आहे. अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे गरजेचे आहे.आपला आर्ज पूर्ण होईल.Mechanization Scheme

शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील “तक्रार/सुचना” या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकत आहेMechanization Scheme

 

 सरकारी योजना पहाण्यासाठी येथे क्लिक करा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती online 2022-23 अर्ज

 

लाभार्थी निवड कशी केली जाते असते

संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जात असते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येत असतो.  ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवड यचा असतो आणि  त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.Mechanization Scheme

शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येत असतो  व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जात असतो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध दिसत असते. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील किवा आधार लिंक मोबाईल असणे आवश्क पाहिजे त्यावर सुद्धा पहाता येईल.त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.

लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहे का ते पहा ?

30 टक्के निधी हा महिला खाते दारांसाठी तर 3 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवला जात आहे. परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाही तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांचे साठी वापरला जात असतो.

पुर्वसंमती  मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी  औजारे खरेदी कोठून करावीत ते जाणून घेऊ या

पुर्वसंमती मिळाल्या नंतर लाभार्थी यांनी खुल्या बाजारतील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेते यांचे कडून यंत्र/औजारे विहित मुदतीत किवा १५ दिवसात  खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी केले नाही तर पुर्वसंमती रद्द होत असते . लाभार्थीं यांनी खरेदी करावयाची औजारे केंद्रीय तपासणी संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केलेली असणे बंधनकारक असुन त्यांनाच अनुदान देता येत असते. या साठी लाभार्थी यांनी विक्रेते यांचेकडून सदर यंत्र/औजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेल्या परिक्षण प्रमाणपत्राचा पुरावा सादर करणे बंधनकारक गरजेचे आहे. औजारे खरेदी करताना त्यावर परिक्षण अहवाल व मॉडेल क्रमांक एम्बॉस केलेला आहे का याची खात्री करुन यंत्र/औजार खरेदी करणे गरजेचे आहे.

तसेच  ट्रॅक्टर , पॉवर टीलर, रिपर, रिपर कम बाइन्डर, पैडि ट्रान्सप्लांटर, थ्रेशर, पॉवर वीडर या औजारांचे बाबतीत ही औजारे खरेदी करताना काळजी घेणे खूप  महत्वाचे आहे. ही औजारे केंद्र शासनाच्या यादीतील नमुद मॉडेल/मेकचीच असली अधिकृत पाहिजे. त्यांनाच अनुदान देय प्राप्त आहे. मात्र या केंद्र शासनाच्या यादीतील औजारे खरेदी केली तर त्याबाबतचा परिक्षण अहवाल/प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आपणास  नाही.

यंत्र/ औजारे खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे पुढील माहिती Mechanization Scheme

यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक ठरत  आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी  यांनी देयकाची प्रत (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावि लागणार आहे. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येत असते. देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात पैसे  जमा करण्यात येईल.Mechanization Scheme

विविध औजारांसाठी अनुदानाची  रक्कम किती असते-

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-

अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/- दिली जाते.

ब. पॉवर टिलर –

  • 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/- दिली जाते.
  • 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- दिली जाते.

क. स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/- दिली जाते.
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/- दिली जाते.
  • रीपर – 75000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 25000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/- दिली जाते.

ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट – 42000/- दिली जाते.
  • रोटाव्हेटर 6 फुट – 44800/- दिली जाते.
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/- दिली जाते.
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/- दिली जाते.
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/- दिली जाते.
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/- दिली जाते.
  • कल्टीव्हेटर – 50000/- दिली जाते.
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/- दिली जाते.
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/- दिली जाते.
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/- दिली जाते.
  • नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/- दिली जाते.
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/- दिली जाते.
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/- दिली जाते.
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/- दिली जाते.

अनुदान – इतर लाभार्थी यांना 40 टक्के

अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/- दिली जाते.

ब. पॉवर टिलर –

  • 8 बीएच पी पेक्षा कमी – 50000/- दिली जाते.
  • 8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त – 70000/- दिली जाते.

स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/- दिली जाते.
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/- दिली जाते.
  • रीपर – 60000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 20000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) – 30000/- दिली जाते.
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 50000/- दिली जाते.
  • ड. ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे
  • रोटाव्हेटर 5 फुट – 34000/- दिली जाते.
  • रोटाव्हेटर 6 फुट – 35800/- दिली जाते.
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/- दिली जाते.
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/- दिली जाते.
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 16000/- दिली जाते.
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/- दिली जाते.
  • कल्टीव्हेटर – 40000/- दिली जाते.
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 56000/- दिली जाते.
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 71600/- दिली जाते.
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 32000/- दिली जाते.
  • पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 40000/- दिली जाते.
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/- दिली जाते.
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/- दिली जाते.
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/- दिली जाते.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

11 thoughts on “Mechanization Scheme: यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2023”

Leave a Comment