ड्रॅगन(Dragon) हे एक प्रकारचे फळ आहे आणि हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता कायम आहे. ड्रॅगन(Dragon) फळांचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती असते. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी, ही झाडी कायमची जळून जात नसतात. फळांचा आकार कमी होईल, मात्र झाडे जिवंत राहत असतात थोडक्यात पाणी थोडेफार असले तरी हे फळ येत असते. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च फार कमी असतो.
या(Dragon) फळाची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड असतात. या फळाचा उपयोग विविध प्रक्रिया करून खाद्य उद्योगात केला जात असतो. जसे की, फळाचा रस, शरबत, जाम, काढा (सिरप) आइस्क्रीम, योगर्ट (४०9५) मुरंबा (जेली), कँडी पेस्ट्री इ आणि कधी कधी फळाचा गर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील केला जात असतो. या फळाचे औषधी उपयोग पण आहेत जसे कि डेंग्यू व मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते, असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होत असते.
हवामान
ड्रॅगन फळ(Dragon) हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून झाडांच्या व फळांच्या वाढीकरिता साधारणतः; २५ ते ३५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवत असते. आणि त्याचप्रमाणे वार्षिक पर्जन्यमान ५०० ते १००० मि.मी. आवश्यक असून उष्ण व थोड्या प्रमाणात दमट हवामान असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे फळ(Dragon) वाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश असावा, परंतु सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त काळापर्यंत शकतो नसावी. सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास अशा वेळेस झाडांना सावली करण्याची आवश्यकता भासत असते.
जमीन
ड्रॅगन फळ (Dragon)या पिकाच्या वाढीकरिता उत्तम पाण्याचा निचरा होणारी, मुर्माती जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थयुक्त, वालुकामय तसेच मध्यम हलकी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन अतिशय चांगली मानवत असते. अशा जमिनीत झाडांची वाढ भारी जमिनीतील झाडांपेक्षा जोमदार असते. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ५.५ ते ६.५ पर्यंत असावा लागतो. फळांची उत्तम प्रत व जादा उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रीय खतांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
ड्रॅगन(Dragon) फळाची लागवड मुळ्या फुटलेल्या, कापलेल्या तुकड्यापासून करत असतात. याकरिता निवड केलेल्या मातृवृक्षापासून १५ ते २० सें.मी. लांबीचे कटिंग्ज काढून ते १ ते २ दिवस एकत्र ठेवावेत आणि शेणखत एक भाग,चांगली माती एक भाग आणि वाळू दोन भाग यांचे मिश्रण करून प्लॅस्टिक पिशवीत भरून घघेत असतात. प्रत्येक पिशवीत तयार केलेली कटिंग्ज लावून सर्व पिशव्या सावलीमध्ये मुळ्यांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ठेवावे.
नंतर मुख्य जाती शेतात लागवडीसाठी वापराव्यात आणि पिशवीत लावल्यानंतर २० ते २५ दिवसांनी मुळ्यांची वाढ जोमदार होण्यास सुरूवात होत असते.
लागवड
ड्रॅगन फळ(Dragon) पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मीटर व दोन रांगेत ३ मीटर अंतर ठेवून ६0 सें.मी. × ६० सें.मी. आकारमानाचे खडडे खोदून घेतले पाहिजे आणि यामध्ये एकरी ४४५ झाडे बसत असतात. खडडे खोदून झाल्यावर खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचे खांब किंवा जी.आय. पोल आकाराचे पाईप पक्के बसवून घेत असतात. या फळझाडाला पोल तसेच फ्रेमचा आधार देऊन वळवावे लागत असते.
पोलची उंची कमीत कमी ६ फूट ठेवत असतात आणि नंतर खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात अंदाजे १० किलो चांगले कुजलेले शेणखत व चांगली माती, रेती आणि २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण मिसळून टाकावे. त्याचप्रमाणे पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी खड्ड्यांच्या तळाशी बारीक विटांचे तुकडे टाकले जावे. खडडे भरण्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक खड्ड्यात पोलच्या समोरासमोर मुळ्या फुटलेल्या चार कटिंग्ज लावून घ्याव्या लागत असतात. या लावलेल्या कटिंग्जची उभी वाढ होण्यासाठी झाडे वाढतील तसे खांबांना बांधून घ्यावीत आणि झाडांची लागवड झाल्यावर प्रत्येक काड्यांवर सेंद्रिय पदार्थाचे २० ते २५ सें.मी. उंचीचे आच्छादन करून झाडांना पाणी द्यावे लागत असते. झाडांची वाढ उंच होत जाईल आणि तसे त्यांना खांबांना बांधून घेत जावे. लागवडीसाठी प्रति एकरी एकूण खर्च रु. ३०००००/- पर्यंत किवा त्येपेक्षात जास्त जात असतो.
मंडप उभारणे ((Trellising)) : ड्रॅगन फळ हे वेलवर्गीय असल्याकारणाने त्याच्या वाढीसाठी मंडप/लाकडाच्या आधाराची गरज भासत असते. ड्रॅगन फळाची लागवड करताना प्रत्येक वेलीला खांबाच्या आधाराची गरज आहे. या वेलींचे आयुष्य हे २० वर्षे असल्याकारणाने खांब हे मजबूत असणारे आवश्यक असते. ड्रॅगन फळ २ वर्षाचे झाल्यावर वेलीचे वजन हे १०० कि.ग्रॅ. पर्यंत जाते व चालू वर्षात खांब बदलणे जिकिरीचे काम असल्याने सुरुवातीलाच सिमेंट काँक्रीटचे खांब बसवणे उत्तम असते खांबाची जाडी १००-५०० मि.मी. व उंची २ मी. असावी आणि वेलीची व्यवस्थित वाढ होण्याकरिता खांबाच्या टोकाला स्टीलची रिंग ज्याला रबरचे टायर असावे, अशी वापरावी जावी.
फळांचे प्रकार
ड्रॅगन फळामध्ये(Dragon) तीन प्रकार आहेत.
१) फळाची वरची साल गुलाबी आणि गर गुलाबी असतो.
२) फळाची वरची साल गुलाबी आणि गर पांढरा असतो.
३) फळाची वरची साल पिवळी आणि गर पांढरा असतो.
खत व्यवस्थापन
ड्रॅॅन फळाच्या(Dragon) पिकाची लागवड नव्यानेच होत असल्याने या पिकावर भारतात खत व्यवस्थापनावर संशोधन झालेले नाही आणि इतर देशांत देण्यात येणाऱ्या खत व्यवस्थापनाचा अभ्यास करून या पिकास पुढीलप्रमाणे खते देण्याची शिफारस केलेली आहे. झाडांची उत्तम वाढ व फळांचे जादा उत्पादन व प्रत मिळविण्यासाठी प्रत्येक खड्ड्यांतील झाडांना १० किलो चांगले कुजलेले शेणखत देऊन यामध्ये प्रत्येक वर्षी दोन किलो शेणखत जास्त द्यावे लागत असते. जास्तीत जास्त २० किलोपर्यंत वाढ करण्यात यावी.
झाडांची वाढ होण्यासाठी सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यातील झाडांना रासायनिक खते प्रत्येकी ४ महिन्यांनी खालीलप्रमाणे दिली पाहिजे.
निमकोटेड युरिया-२८८ ग्रॅम,
सिंगल सुपर फॉस्फेट-२७० ग्रॅम
म्युरेट ऑफ पोटॅश-१६० ग्रॅम.
फळे येणाऱ्या झाडांना भरपूर उत्पादन व प्रत मिळविण्यासाठी प्रत्येक खड्ड्यातील झाडाला १.३३० कि.ग्रॅ. सुफला १५.१५:१५व ३३० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे खते द्यावे आणि निमकोटेड युरिया २०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट २०० ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ४०० ग्रॅम खत द्यावे. प्रत्येक वर्षी खताची मात्रा थोड्या प्रमाणात वाढवत द्यावी लागत असते.
पाणी व्यवस्थापन
झाडांची(Dragon) जोमदार वाढ व उच्च प्रतीची फळे मिळविण्यासाठी कोरड्या हवामानात पाणी देण्याची अत्यंत गरज भासत असते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊ शकते आणि शिवाय ठिबक संचामधून खतांच्या मात्रासुद्धा देता येत असतात. फळ पोसण्याच्या काळात झाडाला पाण्याची कमतरता भासल्यास फळांना तडे जाण्याची शक्यता भासत असते. शिवाय फुलांची गळही होत असते.
फळ निर्मिती
फुलांची निर्मिती झाल्यावर फळे ३० ते ३५ दिवसांत काढणीस तयार होत असतात आणि फळांची काढणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालू असते. या (Dragon)काळात फळाची काढणी ५ ते ६ वेळा करावी लागत असते. अपक्व फळांची वरील साल चकचकीत हिरव्या रंगाची असते आणि त्यानंतर जेव्हा सालीचा रंग लाल होतो तेव्हा फळ काढणीस तयार झाले आहे, असे समजले जात आहे. फळाच्या हिरव्या सालीचा रंग लाल होण्यास अंदाजे ४ ते ५ दिवस लागत असतात. या वेळेस फळांची काढणी करता येते आणि निर्यातीसाठी फळांची काढणी रंग बदलत असताना एक दिवस अगोदर करावी.
छाटणी
फळांची काढणी संपल्यानंतर झाडांची दरवर्षी नियमित छाटणी करणे गरजेचे आहे. छाटणी करताना झाडांचा वरील भाग छत्रीच्या आकाराचा राहील, असे पाहावे आणि अडचणीच्या फांद्यांची छाटणी करावी म्हणजे संपूर्ण झाडाला आतपर्यंत सूर्यप्रकाश जावू शकेल. नियमित छाटणी केल्यास झाडांवर नवीन फूट येऊन पुढील वर्षात जास्त फळांचे उत्पादन मिळू शकणार आहे. उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फळाचे ४ ते १० टन प्रति एकर उत्पादन मिळत असते. सध्या बाजारात ड्रॅगन फळाचा दर रु. १०० ते २५०/- प्रति जास्त किलोपर्यंत आहे. महाराष्ट्रातील उष्ण हवामान असणाऱ्या जिल्ह्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी या फळ पिकांची लागवड केल्यास निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे..
काढणी व उत्पादन
फळाची(Dragon) फळधारणा ही ६-९ व्या महिन्यापासून होते, परंतु उत्पादन हे लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून घेतले जात असते. फळाचे वजन सर्वसाधारण ३५० ग्रॅम असते. फळाची काढणी ही निवडक पद्धतीने करत असतात. एका आठवड्यामध्ये दोनदा काढणी करावी आणि फळाची काढणी ही व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने फळाला इजा न होता करावी व काढणी पश्चात, थंड सावलीच्या ठिकाणी साठवणपूर्व ठेवली जावी. ड्रॅगन फळ हे झाडावर असताना पिकत असते.
हे हि वाचा : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना
मस्तच