Cheating With Youth Farmer : एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न शेतकरी तरुणांची फसवणूक - डिजिटल शेतकरी

Cheating With Youth Farmer : एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न शेतकरी तरुणांची फसवणूक

Cheating With Youth Farmer : शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न गंभीर होत असताना, एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न लावण्याचा प्रकार गुंजाळवाडी (आर्वी) व खोडद येथे उघड झाला आहे. येथील शेतकरी कुटुंबांतील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा (नाव बदलून) विवाह लावून सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये नवऱ्या मुलीसह पसार झालेल्या एका महिलेसह तीन एजंटांवर (मध्यस्थी) नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे.

( Cheating With Youth Farmer )या प्रकरणी एजंट मीरा बन्सी विसलकर (रा. घोटी उभाडे, जि. नाशिक), बाळू गुलाब सरवदे (रा. गुंजाळवाडी आर्वी, नारायणगाव, ता. जुन्नर), शिवाजी कुरकुटे (रा. बोटा, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली गेली आहे. याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर वायकर हा शेतकरी कुटुंबातील पदवीधर तरुण आहे आणि ते शेती व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व नोकरी नसल्याने त्यांचे लग्न जमवण्यात अडचण येत होती.

मध्यस्थ बाळू सरवदे व मीरा विसलकर यांनी सागर वायकर यांना संध्या विलास बदादे (वय २३, रा. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे नाव असलेल्या एका मुलीचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला होता.

त्यानंतर बोलणी होऊन १० मे २०२३ रोजी लग्न करावयाचे ठरले तसेच मुलीची परिस्थिती हालाखीची असून तिला वडील, बहीण, भाऊ नसून आई एकटीच असून ती आजारी असल्याने लग्न करायचे असेल तर मुलीच्या आईसाठी एक लाख तीस हजार रुपये द्यावे लागतील, असे मीरा विसलकर व बाळू सरवदे यांनी सांगितले.

यावर विश्वास ठेवून वायकर पैसे देण्यास तयार झाले आणि त्या नंतर ठरल्याप्रमाणे १० मे रोजी शिवपार्वती विवाह सोहळा केंद्र भाईकोतवाल चौक, जुन्नर येथे वैदिक पद्धतीने विवाह झाला.दरम्यान जुन्नर कोर्टामध्ये नोंदणी करण्यासाठी वधू, वर गेले असता वधूच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने नोंदणी झाली नाही त्या नंतर १७ मे रोजी रोजी पत्नी संध्या हिला मीरा बन्सी विसलकर या माहेरी घेऊन गेल्या. त्या नंतर वारंवार फोन केला पण मात्र, आजारी असल्याचे कारण सांगून पत्नी संध्या हिने येण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, २८ मे २०२३ रोजी वायकर यांनी मीरा विसलकर यांना फोन केला असता संध्या पळून गेली आहे आणि  तुम्हाला दुसरी मुलगी देतो. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू नका, असे विसलकर यांनी सांगितले. या मुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय वायकर यांना आला. दरम्यान, वायकर यांनी चौकशी केली असता, आपल्याबरोबर विवाह झालेल्या मुलीचा विवाह अश्विनी गवारी या नावाने २८ मार्च २०२३ रोजी मीरा विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी खोडद येथील हरीश बाळशिराम गायकवाड यांच्यासोबत लावून दिल्याचे आणि त्यानंतर अश्विनी व एजंट पसार झाल्याचे तसेच विवाह जमवण्यासाठी गायकवाड यांच्याकडून विसलकर हिने एक लाख ६० हजार रुपये घेतल्याचे समजले होते.(Cheating With Youth Farmer )

एकाच मुलीचा सागर वायकर व हरीश गायकवाड यांच्यासोबत विवाह करून दागिने व रोख रक्कम, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे.

आळेफाटा येथेही शेतकरी तरुणाची फसवणूक

दरम्यान, याच प्रकारे आळेफाटा येथील तरुणासोबत १८ मे रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात विवाह करून अडीच तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे हि वाचा : डेबिट की क्रेडिट कार्ड… पेमेंटसाठी योग्य ऑप्शन कोणता? कोणते कार्ड अधिक फायदेशीर?

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment