Hailstorm Forecast: उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे आणि आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीचा, तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला गेला आहे.(Hailstorm Forecast)
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत आणि शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, परभणी येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे काल होते. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे आणि राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तसेच दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून बिहार पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे.(Hailstorm Forecast)
राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, आज (ता. ३) विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे आणि राज्यात उष्ण व दमट असह्य होण्याची शक्यता आहे. राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे, सातारा जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३६.५ (२३.८), जळगाव – (२७.९), धुळे ४२.० (-), कोल्हापूर ३६.१ (२३.३), महाबळेश्वर २९.९ (१८.०), नाशिक ३५.९ (२४.४),
निफाड ४०.६ (२६.०), सांगली ३६.९ (२३.०), सातारा ३८.५ (२३.५), सोलापूर ४१.९ (२५.५), सांताक्रूझ ३४.५ (२८.९), डहाणू ३४.८ (२९.३), रत्नागिरी ३४.० (२६.५),
छत्रपती संभाजीनगर ४०.६ (२४.२), नांदेड ४२.६ (२७.८), परभणी ४३.० (२८.०), अकोला ४३.४ (३१.०), अमरावती ४३.६(२७.७), बुलढाणा ४०.० (२६.८), ब्रह्मपूरी ४२.८ (२७.७),
चंद्रपूर ४३.२(२६.६), गोंदिया ४३.५ (२६.२), नागपूर ४३.० (२५.६), वर्धा ४३.४(२९.४), वाशीम ४२.६(२७.४) यवतमाळ ४२.७ (२९.०).
कमी दाब क्षेत्रासाठी पोषक वातावरण
Hailstorm Forecast: अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे आणि या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मॉन्सूनची वाटचाल जैसे थे
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी (ता. २) लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली तसेच शनिवारी (ता. ३) मॉन्सूनची वाटचाल जैसे थे होती. मॉन्सूनचे केरळातील आगमन यंदा लांबले आहे.
हे हि वाचा : मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर