Chief Minister's Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधी आता फक्त एका मिसकॉल वर....2023 - डिजिटल शेतकरी

Chief Minister’s Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधी आता फक्त एका मिसकॉल वर….2023

Chief Minister’s Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बळ घटकातील नागरिकांना विविध क्षेत्रात वरील उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते आहे. अर्ज भरवण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येत असतात. ग्रामीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदाराला करावा लागत आहे. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७  हा मोबाईल क्रमांक देऊन केवळ मिस कॉल पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी(Chief Minister’s Aid Fund) करिता वेळ काढून प्रक्रियेतून आता सहज सोपे आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे आणि ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झीजवायची गरज लागणार नाही. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्याने नव्याने प्रक्रिया करावी लागत असते. ते उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिस कॉल अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली गेली आहे.

Chief Minister's Aid Fund
Chief Minister’s Aid Fund

या आजारासाठी सर्वाधिक अर्ज

Chief Minister’s Aid Fund:कर्क रोगावरील उपचार मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात. एकूण अर्जाच्या एकूण 25% अर्ज असून त्या खालोखाल हृदयविकार, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, अपघात, डायलेसिस, किडनी विकार, कॅन्सर, भाजलेले किंवा शॉक लागलेले यासाठी जास्त अर्ज येत आहेत.

लवकरच ॲप तयार करण्यात येणार

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात. त्यामुळे मदत करण्यास अडचणी येत आहेत.. सध्या मिस कॉल ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असली तरी लवकरच अर्जासाठी ॲप बनविले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथले सर्व माहिती अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षांशी संपर्क साधावा लागणार नसल्याने चे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता फक्त मिसकॉल देण्याची आवश्यकता आहे. आता फक्त एका मिसकॉल तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे तसेच मागील एक वर्षात हजारो गरजूंना मदत दिली आहे.

 मंगेश चीवटे

 प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्य

हे हि वाचा : डेबिट की क्रेडिट कार्ड… पेमेंटसाठी योग्य ऑप्शन कोणता? कोणते कार्ड अधिक फायदेशीर?

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment