Onion Subsidy: शेतकऱ्यांसाठी बातमी: कांदाचाळ उभारण्यासाठी मिळणार 'इतकं' अनुदान.. - डिजिटल शेतकरी

Onion Subsidy: शेतकऱ्यांसाठी बातमी: कांदाचाळ उभारण्यासाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान..

Onion Subsidy: शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतारापासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी, कांदा साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कांदे साठवण करण्यासाठी गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Subsidy: कांद्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना कांदा साठवण गोदामासाठी रुंदी 3.90 मीटर, लांबी 12.00 मीटर, एकूण उंची 2.95 मीटर (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमानावर कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायिकरीत्या शेतकरी, गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ देण्यात येईल.

अनुदानाबाबत..(Onion Subsidy)

कांदाचाळ संदर्भात मनुष्यदिन संख्या गृहीत धरुन आर्थिक मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीत मनरेगाचे अनुज्ञेय अकुशल मजुरीचे दर रुपये 273 नुसार कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरीता एकूण लागणारे मनुष्यदिन 352.45 नुसार 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 इतकी मजूरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल मनुष्यबळासाठी 40 टक्केच्या मर्यादेत 64 हजार 147 रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत असे एकूण 1 लाख 60 हजार 367 रूपये इतका (मजुरी दर रू. 273 असल्यावर) अनुज्ञेय आहे.

Onion Subsidy दरम्यान पुढील वित्तीय वर्षात जर मजुरीचा दर वाढला तर यात सुद्धा वाढ होईल. उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 363 रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने कांदाचाळीसाठी एकूण खर्च 4 लाख 58 हजार 730 रुपये देण्यात येईल, अशी माहीती आहे.

हे हि वाचा: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment