कपाशी खत व्यवस्थापन 2022 - डिजिटल शेतकरी

कपाशी खत व्यवस्थापन 2022

कपाशी खत व्यवस्थापन

कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे गरजेचे  आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम  इत्यादी सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासत असते.

१. लागवडीपूर्वी एकरी २५-२७  किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३५ किलो पालाश, १० किलो गंधक व १० किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे लागत असते.

२. लागवडीपासून २५-३०  दिवसांनी एकरी २५-२७  किलो नत्र (कॅल्शियम अमोनियम नायट्रेटच्या स्वरूपात).

३. लागवडीपासून ५०-५५  दिवसांनी २५ किलो नत्र, ३५ किलो पालाश, १० किलो गंधक व १० किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे.

४. लागवडीपासून ७०-७५  दिवसांनी २५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या स्वरूपात).

५. लागवडीपासून २१-२३  दिवसांनी डेपोखताचा वापर करावा

हे हि वाचा : कपाशीवरील रोग

डेपोखत: एक किवा दोन  बैलगाडी शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळखताचा डेपो सावलीत करावा. यामध्ये ५ किलो झिंक सल्फेट, ५ किलो फेरस सल्फेट, ५ किलो मँगनीज सल्फेट, १ किलो बोरॉन टाकून डेपो एकवेळ खो-याने चांगला मिसळून घेतला जावा. त्यानंतर ५० लिटर पाण्यात १ किलो अॅझॅटोबॅक्टर, १ किलो ट्रायकोडर्मा व ५ किलो पीएसबी मिसळून हे द्रावण या डेपोवर वरून  शिंपडावे. परत एकदा हा डेपो चांगला मिसळून घ्यावा आणि  हा डेपो सावलीत ७ दिवस ओलसर राहिल या पद्धतीने ठेवावा. कापूस लागवडीनंतर १९  ते २१ दिवसांदरम्यान पडणा-या पाळी बरोबर तो एक एकर क्षेत्रामध्ये जमिनीत मिसळावा.

ठिबक सिंचनाचा वापर करणा-या शेतक-यांनी पाण्याची आणि खतांची उपयोगिता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचन संचामधून करणे अधिक फायद्याचे ठरत असते. या तंत्रज्ञानास फर्टिगेशन तंत्रज्ञान असे संबोधले जात असते. फर्टिगेशन तंत्रामुळे कापसाचे दर्जेदार गुणवत्तेचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होत आहे.

कापूस पिकासाठी विद्राव्य खतांच्या माञा-

खते देण्याचा कालखंड ,खताचा ग्रेड,खताची एकूण मात्रा (किलो/एकर),खते देण्याची मात्रा (किलो/एकर/दिवस)

लागवडीनंतर ८  ते २२ दिवस—

१२:६१:००–८.३३ किलो-.०.५५५ किलो

१९:१९:१९–२५ किलो–१.६६० किलो

युरिया–१५ किलो–१.००० किलो

लागवडीनंतर २३ ते ६१  दिवस–

१२:६१:००–२६.२२ किलो–०.७०८ किलो

युरिया–३४.२१ किलो–०.९२४ किलो

पांढरा पोटॅश– १३.१६ किलो–०.३६१ किलो

लागवडीनंतर ६२  ते १०० दिवस–

युरिया–२५.३४ किलो–०.६३३ किलो

पांढरा पोटॅश–१३.३६ किलो–०.३३४ किलो

लागवडीनंतर १०१ ते १२६  दिवस–

युरिया–१५.०० किलो–०.६०० किलो

पांढरा पोटॅश–१६.७० किलो–०.६६८ किलो

अन्नद्रव्यांची कमतरता व लक्षणे-

अन्नद्रव्य अन्नद्रव्यांच्या आभावाची लक्षणे आणि उपाय

मॅग्नेशियम पाने लाल होतात १% मॅग्नेशियम सल्फेट फवारावे.

लोह/मॅग्निज -पाने पिवळी होतात-०.३ ते ०.५% फेरस सल्फेट किंवा ०.३ ते ०.५% मॅग्निज सल्फेट फवारावे.

Leave a Comment