Cotton Harvesting जळगाव ः खानदेशात मे अखेरीस व पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे काही ठिकाणी उमलत (Cotton Production) आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अतिपावसात कापसाचे नुकसान (Cotton Crop Damage) झाले आहे. परंतु अशा स्थितीतही शेतातला कापूस(Cotton) घरात आणण्याची धावपळ, सर्कस शेतकरी करीत आहेत आणि त्यासाठी मजुरीदेखील (Cotton Harvesting Wages) अधिकची द्यावी लागत आहे. कापूस वेचणी सहा रुपये प्रतिकिलो आहे तसेच सात तास कामासाठी १५० रुपये रोज अशी मजुरीदेखील लागत आहे.
खानदेशात मंगळवारी (ता. २०) अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती आणि यामुळे सकाळी १० पासून कापूस वेचणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. मिळतील तेथून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली जाते. कारण पावसाने कापसाचे(Cotton) सतत नुकसान होत आहे आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी शेतातील कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सहा रुपये प्रतिकिलो, या दरात काही भागांत कापसाची वेचणी करण्यात आली आहे. मजूर कमी असल्याने वेचणी व इतर शेतीकामे रखडतच सुरू आहेत. तसेच कापूस(Cotton) वेचणीसठी १५० रुपये रोजगारही घेतला जात आहे.
एक मजूर दिवसभरात १० ते १२ किलो कापसाची वेचणी करीत असतो. तर सहा रुपये प्रतिकिलो या मजुरी दरात एक मजूर १२ किलोपेक्षा अधिकची कापूस वेचणी करीत आहेत कारण यात जेवढी वेचणी करता येईल, तेवढी अधिक मजुरी मिळत असते. कापसात ओलावा असल्याने मजुरी दर अधिक पडत आहेत. कारण वेचणीनंतर कापूस वाळवून घ्यावा लागत आहे आणि त्यात आर्द्रता कमीत कमी असावी, असा शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
कारण अधिक ओलाव्याच्या कापसाला दर कमी मिळत असतात. कापूस वेचणी आता पुढे दिवाळीपर्यंत सतत सुरू राहील आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत किंवा चांगले ऊन पडल्यास कापसात बोंडे उमलण्याचे प्रमाण वाढेल. तसेच त्याचा दर्जाही चांगला राहणार आहे. यामुळे शेतकरी कोरड्या, सूर्यप्रकाशीत वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत आणि मजूरटंचाई अधिकची राहील, असेही संकेत आहेत.
3 thoughts on “Cotton Harvesting : कापूस वेचणीदर भडकले 2022”