Cotton Picking Wages: पांढरे सोने, अर्थात कापूस पिकातील वेचणीचे काम या आठवड्यात खानदेशात बऱ्यापैकी सुरू झाले आहे आणि यंदा वेचणीची मजुरी सहा रुपये प्रतिकिलो, अशी आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत असते.Cotton Picking Wages
पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात सध्या वेचणी सुरू आहे आणि मागील काही दिवस निरभ्र, कोरडे वातावरण आहे. पूर्वहंगामी किंवा मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कापूस पिकातील पक्व कैऱ्या उमलण्याची क्रिया गतीने सुरू झाली आहे.
खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी पीक आहे आणि या क्षेत्रात एकाच वेळी बोंडे वेचणीवर आली आहेत. पुढे सणासुदीचे दिवस आहेत. यामुळे सर्व शेतकरी वेचणीच्या लगबगीत आहेत तसेच नेहमीप्रमाणे यंदाही मजूरटंचाई तयार झाली आहे.
यामुळे शेतकरी इतर गावांमधून वेचणीसाठी मजूर आणत आहेत आणि सातपुडा पर्वतालगतच्या भागात सातपुड्यातील मजूर कामासाठी येत आहेत. मालवाहू, प्रवासी वाहनातून सकाळीच मजूर जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार भागांत पोहोचतात. यासाठीचा वाहतूक खर्च शेतमालकास द्यावा लागतो.Cotton Picking Wages
पिकात बोंडे उमलण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे आणि बोंडेही दर्जेदार, शुभ्र व मऊ आहेत. वेचणी व्यवस्थित होत आहे. यामुळे सध्या प्रतिकिलो या दरानुसार वेचणी सुरू आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू होता.
यामुळे प्रतिरोज यानुसार कापूस वेचणी करून घ्यावी लागत होती आणि यंदा मात्र प्रतिकिलो या मानकानुसार अनेक शेतकरी वेचणीवर भर देत असून, प्रतिकिलो सहा रुपये एवढी मजुरी सध्या गावोगावी दिली जात आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोंडे कमी उमलेले आहेत, ते शेतकरी प्रतिरोज यानुसार मजुरी देत आहे आणि यात सकाळी नऊ ते चार या कालावधीत कामासंबंधी २०० रुपये प्रतिरोज आणि सकाळी आठ ते दीड या कालावधीत कामासंबंधी १५० रुपये रोज दिला जात आहे.
प्रतिकिलो यानुसार काम करताना जेवढी अधिकची कापूस वेचणी मजूर करील, तेवढी अधिक मजुरी मिळते तसेच प्रतिरोज यानुसार काम करताना मात्र मजुरी दर निश्चित असतो.
आजोबांच्या संपत्ती वर किती अधिकार असत
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा
या भावात लेबर मिळत असेन तर माझ्याकडे पाठवा 10 एकर कापूस आहे आमच्याकडे 15 किलो चा भाव आहे